)
Womens World Cup 2025 : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 (Womens World Cup 2025) यंदा भारतात होत आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) महिला संघाला कधीही वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. यंदा भारतात वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडियाच्या महिला संघाकडून वर्ल्ड कप विजयाच्या अपेक्षा क्रिकेट प्रेमींनी ठेवल्या आहेत. मात्र अशातच टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर ऑस्ट्रेलिया अशा सलग दोन पराभवांमुळे त्यांचं सेमीफायनलमध्ये पोहोचण सुद्धा आता अवघड होण्याच्या मार्गावर आहे. रविवार 12 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर आता टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये स्थान मिळवण्याचं समीकरण कसं असेल याबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडियाने महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले असून यातील श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध सामना त्यांनी जिंकला. मात्र गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात मात्र त्यांचा पराभव झाला. रविवारी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 331 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र तरी सुद्धा टीम इंडिया हा स्कोअर डिफेन्ड करू शकली नाही आणि ऑस्ट्रेलीयाने त्यांच्यावर 3 विकेटने विजय मिळवला.
टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्पर्धेत काल सलग दुसरा पराभव झाला असाल तरी देखील सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना पुढील उर्वरित 3 सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाचे पुढील तीन सामने हे इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध आहेत. यापैकी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या विरुद्धचा सामान टीम इंडियासाठी अटीतटीचा होऊ शकतो. या तीन सामन्यांपैकी भारताने एकही सामना गमावला तर त्यांचा सेमीफायनलचा मार्ग कठीण होऊ शकतो.
सध्या महिला वर्ल्ड कप 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 4 सामने जिंकून 7 पॉईंट्स सह प्रथम स्थानी आहे. त्यांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर 6 पॉईंट्स सह इंग्लंडचा संघ आहे. तिसऱ्या क्रमांकावर 4 पॉईंट्स सह टीम इंडिया आहे. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिका 4 पॉईंट्सने टीम इंडियाच्या बरोबरीला असली तरी त्यांचा रनरेट मात्र निगेटिव्हमध्ये आहे.
आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ कुठे होत आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय?
उत्तर: हा वर्ल्ड कप यंदा भारतात होत आहे. टीम इंडियाच्या महिला संघाने यापूर्वी कधीही वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली नाही, त्यामुळे घरच्या मैदानावर खेळत असल्याने क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा खूप आहेत. मात्र, सलग पराभवांमुळे आव्हान वाढले आहे.
सध्याच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची स्थिती काय?
उत्तर: ऑस्ट्रेलिया ४ सामने जिंकून ७ पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड ६ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर, तर भारत ४ पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका देखील ४ पॉईंट्ससह चौथ्या स्थानावर आहे, पण त्यांचा नेट रन रेट नकारात्मक आहे.
टीम इंडियाच्या पुढील सामन्यांची यादी काय?
उत्तर: पुढील तीन सामने: इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध. हे सर्व सामने सेमीफायनलच्या दृष्टीने निर्णायक आहेत, आणि भारताला सर्व जिंकावे लागतील.