close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

World Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर

२०१९ वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला.

Updated: Jul 15, 2019, 08:02 PM IST
World Cup 2019 : आयसीसीकडून 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर

दुबई : २०१९ वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक फायनलमध्ये इंग्लंडचा विजय झाला. वर्ल्ड कपची ही फायनल टाय झाल्यानंतर झालेली सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडला विजयी टीम घोषित करण्यात आलं. १९९६ वर्ल्ड कपनंतर क्रिकेट विश्वाला नवीन विश्वविजेती टीम मिळाली. १९९६ साली श्रीलंकेने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड कपला गवसणी घातली.

४६ दिवस चाललेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक खेळाडूंनी आपली छाप पाडली. अशा १२ खेळाडूंची आयसीसीने 'टीम ऑफ द टुर्नामेंट' जाहीर केली आहे. या यादीमध्ये सर्वाधिक ४ खेळाडू इंग्लंडचे आहेत. तर न्यूझीलंडच्या ३ खेळांडूचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी २ आणि बांगलादेशच्या १ खेळाडूचा समावेश आहे. केन विलियमसन याच्याकडे या टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 

आयसीसीच्या यादीत टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा समावेश आहे. रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने वर्ल्ड कपच्या ९ मॅच खेळल्या. यात त्याने ५ शतकांच्या मदतीने ६४८ रन केले. एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम देखील रोहितने केला. याआधी एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं लगावली होती.

जसप्रीत बुमराहने ९ मॅचमध्ये टीम इंडियासाठी एकूण १८ विकेट घेतल्या. बुमराहने या वर्ल्ड कपमध्ये नेहमी प्रमाणे आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली. टीमला निर्णायक क्षणी त्याने विकेट मिळवून दिल्या. तर काही मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम बुमराहने केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्य यादीत बुमराह ५ व्या क्रमांकावर आहे.

आयसीसीने जाहीर केलेली टीम

रोहित शर्मा, जेसन रॉय, केन विलियमसन, जो रुट, शाकिबल हसन, बेन स्टोक्स, एलेक्स कॅरी, जोफ्रा आर्चर, मिचेल स्टार्क, लॉकी फर्ग्युसन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट (१२वा खेळाडू)