World Record 1009 Runs In 327 Balls: जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजांनी रचलेल्या विक्रमांची आकडेवारी पाहून धडकी भरते. बरं या विक्रमांमध्ये सातत्याने एकामागून एक एक भर पडत राहते. सध्याच्या वेगवान क्रिकेटच्या ट्रेण्डमध्ये अनेकदा गोलंदाज अडचणीत येतात आणि धावांचे डोंगर उभे राहतात. क्रिकेट कोणत्याही प्रकारचं असलं तरी एका डावात शतक झळकावण्यासाठी फलंदाजाला खूपच मेहनत घ्यावी लागते. द्विशतक किंवा त्रीशतक झळकावणं तर त्याहून कठीण काम. असे विक्रम नावावर करायला फलंजांना सातत्यपूर्ण खेळीबरोबरच बराच काळ वाट पहावी लागते. कसोटी क्रिकेटमध्ये फक्त वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याला 400 धावांचा टप्पा गाठता आला आहे. त्यापूर्वी लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501 धावाही केल्यात. मात्र तुम्हाला एका फलंदाजाने एकाच डावात एकट्याने एक हजार धावा केल्यात असं सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना? पण हे खरं आहे. हा फलंदाज कोण ते पाहूयात...
क्रिकेटच्या इतिहासात एका फलंदाजाने एकाच डावात एकट्याने एक हजार धावा केल्या. हा अजूनही रेकॉर्ड बुकमध्ये जैसे थे आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर हा विक्रम आहे तो भारतीय असून मराठी आहे. नाही नाही, सचिन किंवा गावसकर किंवा अजिंक्य रहाणे यापैकी कोणीही नसून या खेळाडूचं नाव प्रणव धनावडे असं आहे. प्रणवने 9 वर्षांपूर्वी मुंबई शालेय क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक खेळीने खळबळ उडवून दिली होती. 2016 मध्ये त्याने आपल्या विक्रमी खेळीच्या जोरावर रेकॉर्ड बुकमध्ये सुवर्णाक्षरांनी आपले नाव नोंदवले. प्रणव धनवडेने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयेजित केलेल्या भंडारी कप आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही विक्रमी खेळी केलेली.
प्रणव धनावडे हा केसी गांधी स्कूलकडून आर्य गुरुकुलविरुद्ध एका डावात एक हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. केसी गांधी स्कूलने अखेर 1465 धावांवर आपला डाव घोषित केला. या डावामध्ये प्रणव धनावडे 1009 धावांवर नाबाद राहिला. या ऐतिहासिक खेळीसाठी त्याने 395 मिनिटांमध्ये म्हणजेच साडेसहा तासांहून अधिक काळ खेळत 323 चेंडू खेळला. त्याचा स्ट्राइक रेट 312.38 इतका होता. या खेळीत प्रणव धनावडेने 59 षटकार आणि 129 चौकारांचा समावेश होता.
आर्य गुरुकुल संघ पहिल्या डावात 31 धावांवर बाद झाला. यानंतर, केसी गांधी स्कूलचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला. आकाश सिंग आणि प्रणव यांनी पहिल्या विकेटसाठी 546 धावांची भागीदारी केली. 173 धावा करून आकाश बाद झाला. त्याने 92 चेंडूंमध्ये 29 चौकार मारले. या काळात प्रणव सतत धावांमध्ये भर घालत होता. आकाश बाद झाल्यानंतर त्याने सिद्धेश पाटीलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 531 धावांची भागीदारी केली.
सिद्धेश पाटीलनेही शतक झळकावले. त्याने 92 चेंडूंचा सामना केला आणि 19 चौकार मारले. शास्वत जगतापने 31 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने प्रणवसोबत तिसऱ्या विकेटसाठी 254 धावांची भागीदारी केली. प्रणवची वादळी खेळी थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. 1009 धावा काढल्यानंतर तो अखेर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. अमन यादवने नाबाद 36 धावा केल्या. केसी गांधी स्कूलने 3 बाद 1465 धावांवर डाव घोषित केला. संघाला 1434 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात आर्य गुरुकुल संघ 52 धावांवर सर्वबाद झाला. केसी गांधी स्कूलने हा सामना एक डाव आणि 1382 धावांनी जिंकला.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More
LIVE|
NEP
96/6(15.4 ov)
|
VS |
UAE
|
| Full Scorecard → | ||
|
PBKS
(20 ov) 254/7
|
VS |
LSG
200/5(20 ov)
|
| Punjab Kings beat Lucknow Super Giants by 54 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RR
(20 ov) 155/9
|
VS |
KKR
161/6(19.4 ov)
|
| Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 194/9
|
VS |
CSK
184/8(20 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Chennai Super Kings by 10 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.