WPL 2025: महिला प्रीमियर लीगमध्ये लफडा... हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोनमध्ये झाली बाचाबाची, Video Viral

WPL 2025, Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone: महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन यांच्यात बाचाबाची झाली.  

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 7, 2025, 12:13 PM IST
WPL 2025: महिला प्रीमियर लीगमध्ये लफडा... हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोनमध्ये झाली बाचाबाची, Video Viral
Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone Fight

Harmanpreet Kaur And Sophie Ecclestone Fight Video: महिला प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) सुरु आहे. या मालिकेत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध यूपी वॉरियर्स (UP Warrior)  यांच्यात लढत झाली. यावेळी मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि यूपी वॉरियर्सची सोफी एक्लेस्टोन  (Sophie Ecclestone) या दोघीत बाचाबाची झाली. याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर सहा गडी राखून पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले आहे. चला जाणून घेऊयात  हरमनप्रीत आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यात नक्की कोणत्या गोष्टीमुळे बाचाबाची झाली. 

Add Zee News as a Preferred Source

कशामुळे झाली बाचाबाची? 

 यूपी वॉरियर्सची फलंदाजी सुरु असताना 19व्या षटकानंतर, अंपायरने हरमनप्रीतला सांगितले की स्लो ओव्हर-रेटमुळे, शेवटच्या षटकात फक्त तीन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतील. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला हे पटले नाही. तिने लगेच अंपायरशी बोलण्यास सुरुवात केली. एमिलिया केरला शेवटचे षटक टाकणार होती, अंपायरने सांगितल्यामुळे तीही चिंतेत दिसत होती. याच दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली सोफी एक्लेस्टोनने अंपायरजवळ हरमनप्रीत कौरकडे बोट दाखवत काहीतरी बोलण्यास सुरुवात केली. हरमनप्रीतला हे अजिबात आवडले नाही. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. या दोघींना थांबवण्यासाठी दोन्ही पंचांना येऊन हस्तक्षेप करावा लागला.

हे ही वाचा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील Champions Trophy 2025 फायनल रद्द झाल्यास चॅम्पियन कोण होणार? जाणून घ्या ICCचा विशेष नियम

 

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

 

हे ही वाचा: वीरेंद्र सेहवागवर कोसळला संकटांचा डोंगर, धाकट्या भावाला अटक; 'या' प्रकरणी होता फरार घोषित

मुंबई इंडियन्सला सहज मिळाला विजय

अमेलिया केर आणि हेली मॅथ्यूज या दोघींच्या उत्तम कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला. मुंबईने  महिला प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा सहा गडी राखून पराभव करत शानदार विजय संपादन केला. केरच्या शानदार पाच विकेट्स (5-38) आणि मॅथ्यूजच्या अष्टपैलू कामगिरीमुळे (46 चेंडूत 2-25 आणि 68) मुंबईने एकना क्रिकेट स्टेडियमवर 151 धावांच्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने या सीजन मधील सर्वोत्तम सुरुवात केली. यामध्ये जॉर्जिया वॉलने (३३ चेंडूत ५५ धावा) आघाडी घेतली.

हे ही वाचा: S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

 

मुंबई इंडियन्सचा चौथा विजय 

मुंबई इंडियन्सचा 6 सामन्यांमधला हा चौथा विजय आहे. 8 गुणांसह मुंबईचा हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, यूपी वॉरियर्सची अवस्था फारच वाईट दिसत आहे. या संघाने आतापर्यंत 7 सामन्यांत केवळ दोनच विजय मिळवले आहेत. 4 गुणांसह तो गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More