WPL 2026 : महिला प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) स्पर्धेला दिमाखात सुरुवात झालेली आहे. 9 जानेवारी पासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि आतपर्यंत यात एकूण 5 सामने खेळवण्यात आले आहेत. या सामन्यांना क्रिकेट रसिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. मात्र अशातच आता 14 आणि 15 जानेवारी रोजी नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणारे सामने हे बंद दाराआड म्हणजेच प्रेक्षकांशिवाय खेळवले जाण्याची शक्यता आहे. बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात, तर गुरुवारी मुंबई इंडियंस विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.
महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचे सामने हे नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहेत. मात्र अशातच महाराष्ट्रात महापालिका निवडणूक पार पडत आहेत. 13 जानेवारी रोजी या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, त्यानंतर 15 जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी 15 जानेवारी आणि त्याच्या आदल्या दिवशी, 14 जानेवारी रोजी गर्दीचे व्यवस्थापन करणे कठीण होऊ शकते, कारण निवडणुकीमुळे बहुतेक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. त्यामुळे बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी या दोन दिवशी महिला प्रीमियर लीगचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात येऊ देऊ नये असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
15 जानेवारी रोजी निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यावर 16 जानेवारीला गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना नवी मुंबईच्या डिवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल. प्रेक्षकांना हा सामना स्टेडीयममध्ये जाऊन पाहता येईल.
सेक्रेटरी देवजीत सैकियाने आयएएनएसला सांगितलं की, '15 जानेवारीला मतदान आहे. म्हणून 14 जानेवारी आणि मतदानाच्या दिवशी आम्ही गर्दीशिवाय WPL सामने आयोजित करता येतील का याचा विचार करत आहोत. एकदा आम्ही हे अंतिम केले की, आम्ही सार्वजनिक सूचना जारी करू. सामने वेळापत्रकानुसार होतील, परंतु चाहते स्टेडियममध्ये उपस्थित राहतील की नाही यावर आम्ही अजूनही चर्चा करत आहोत. तरी यामध्ये 16 तारखेचा समावेश नाही कारण 15 तारखेला निवडणूक आहे. मला वाटते 16 तारखेला मतमोजणी असेल, म्हणून आम्ही त्याचा विचार करत नाही आहोत.
हेही वाचा : युजवेंद्र चहल - धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः सांगितलं सत्य
महिला प्रीमियर लीगचं हे चौथं वर्ष असून इंडियन प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने याची सुरुवात केली. महिला प्रीमियर लीगमध्ये सुरुवातीपासून ५ संघांचा सहभाग असून यात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरिअर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात जाएंट्स यांचा समावेश आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीजनचं विजेतेपद हे मुंबई इंडियन्सने पटकावलं, तर दुसऱ्या सीजनचं विजेतेपद हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकलं, तर तिसऱ्या सीजनला पुन्हा मुंबई इंडियन्सने विजेतेपद नावावर केलं. या तिन्ही सीजनच्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ उपविजेता ठरला होता.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 202/7
|
VS |
ITA
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.