WPL 2026 : जगप्रसिद्ध टी 20 लीग इंडियन प्रीमियर लीगनंतर बीसीसीआय (BCCI) मागील तीन वर्षांपासून वुमन्स प्रीमियर लीगला सुद्धा सुरुवात करण्यात आली. मागच्यावर्षी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) वुमन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी उंचावून दुसऱ्यांदा वुमन्स प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं. आता पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमींना वुमन्स प्रीमियर लीगच्या पुढील सीजनची प्रतीक्षा आहे. अशाच मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 7 जानेवारी 2026 पासून वुमन्स प्रीमियर लीगच्या चौथ्या सीजनला सुरुवात होऊ शकते. अनेक महिला क्रिकेटपटूंनी डिवाय पाटील स्टेडियमला त्यांचं आवडतं मैदान म्हटलं आहे. याच मैदानात भारताने महिला आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफी सुद्धा जिंकली होती. त्यामुळे डिवाय पाटील स्टेडियमवरूनच या सामन्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वुमन्स प्रीमियर लीग 7 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत खेळवली जाण्याची शक्यता आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार फायनल सामना हा वडोदराच्या कोताम्बी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. वडोदरा लेगची सुरुवात 16 जानेवारी पासून होणार आहे. याच्या 5 दिवसांआधीच याच मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे सीरिजचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. रिपोर्टनुसार बीसीसीआयने सर्व संघांच्या मालकांना याबाबतची माहिती देण्यात आली. 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत वुमन्स प्रीमियर लीगचं ऑक्शन होणार आहे. सामने आयोजित करण्यासाठी लखनऊ, बेंगळुरू, मुंबई आणि वडोदरा या शहरांची नावे चर्चेत होती, परंतु असे म्हटले जात आहे की मुंबई आणि बडोदा ही नावे फायनल होऊ शकतात.
मागचा सीजन फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळवला गेला होता, पण यावेळी अनेक कारणांमुळे वुमन्स प्रीमियर लीगचं आयोजन जानेवारीमध्ये होणार आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये भारतात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 होणार आहे हे देखील एक कारण असू शकते.
मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग 2025 ची ट्रॉफी उंचावली होती. फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांनी दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकलं होतं. तर वुमन्स प्रीमियर लीग 2024 ची ट्रॉफी आरसीबीने जिंकली होती. तीनही वेळा दिल्ली कॅपिटल्सने फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही.
वुमन्स प्रीमियर लीगची सुरुवात कधी होणार आहे?
रिपोर्ट्सनुसार वुमन्स प्रीमियर लीगची सुरुवात 7 जानेवारी 2026 होणार आहे.
वुमन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी मागच्या वर्षी कोणत्या टीमने जिंकली आहे?
वुमन्स प्रीमियर लीग २०२५ ची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने जिंकली.
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये किती टीम आहेत?
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये 5 टीम आहेत.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
86/2(23.4 ov)
|
VS |
NZ
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 80/9
|
VS |
INA
81/5(16.2 ov)
|
| Indonesia beat Thailand by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.