WPL Retentions 2026: जाहीर झाली रिटेन्शनची यादी! दीप्ती शर्मासह 'या' दिग्गजांना सोडलं! कोण झालं रिटेन? जाणून घ्या

WPL 2026 Retained Players List:  महिला प्रीमियर लीग 2026 च्या लिलावापूर्वी, पाचही संघांनी त्यांच्या राखीव खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 7, 2025, 02:17 PM IST
WPL Retentions 2026: जाहीर झाली रिटेन्शनची यादी! दीप्ती शर्मासह 'या' दिग्गजांना सोडलं! कोण झालं रिटेन? जाणून घ्या
WPL Retentions 2026 Full Retained Player List

WPL Retentions 2026 Full Retained Player List: महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 च्या ऑक्शनपूर्वी सर्व पाच फ्रँचायझींनी आपल्या-आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या रिटेन्शन प्रक्रियेत काही मोठी आणि अनपेक्षित नावं बाहेर पडली आहेत. सर्वात मोठी चर्चेची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकन कर्णधार आणि स्टार बॅटर लॉरा वोल्वार्ट यांना गुजरात जायंट्सने रिटेन न करण्याचा घेतलेला निर्णय. त्याचप्रमाणे, यूपी वॉरियर्सने अनुभवी ऑलराऊंडर दीप्ती शर्मा हिला टीममधून सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

वोल्वार्ट आणि दीप्ती, आता नव्या संघात?

वोल्वार्टने नुकत्याच संपलेल्या ODI वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करून आपल्या टीमला फायनलपर्यंत पोहचवले होते. तरीही, WPL च्या नियमानुसार फ्रँचायझींना केवळ दोन परदेशी खेळाडूंनाच रिटेन करण्याची मुभा आहे. त्यामुळे गुजरात जायंट्सने बेथ मूनी आणि एश्ले गार्डनर यांना प्राधान्य दिलं. याचप्रमाणे, दीप्ती शर्मा हिनेही वर्ल्ड कपमध्ये मोठी छाप पाडली होती आणि ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ सारखा सन्मानही पटकावला होता. तरीही यूपी वॉरियर्सने फक्त एकच खेळाडू  युवा श्वेता सेहरावतला जपण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दीप्ती ऑक्शनमध्ये मोठी बोली मिळण्याची शक्यता वाढली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा धाडसी निर्णय

प्रमुख भारतीय खेळाडू जसे की हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, ऋचा घोष आणि जेमिमा रोड्रिग्ज यांना त्यांच्या टीम्सने कायम ठेवलं आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने आपली कर्णधार मेग लॅनिंगला रिलीझ करून मोठा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. दिल्लीने शेफाली, जेमिमा, मारिजन कप आणि एनाबेल सदरलंडला समान किंमतीत रिटेन केले आहे.मुंबई इंडियन्सने नॅट सिव्हर-ब्रंटला हरमनपेक्षा जास्त रकमेत कायम ठेवले आहे, तर उदयोन्मुख जी कमालिनीवरही त्यांनी विश्वास दाखवला आहे.

रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी (मुख्य नावे)

मुंबई इंडियन्स

  • नॅट सिव्हर-ब्रंट – ₹3.5 कोटी
  • हरमनप्रीत कौर – ₹2.5 कोटी
  • हेली मॅथ्यूज – ₹1.75 कोटी
  • अमनजोत कौर – ₹1 कोटी
  • जी कमालिनी – ₹50 लाख

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

  • स्मृती मंधाना – ₹3.5 कोटी
  • ऋचा घोष – ₹2.75 कोटी
  • एलिस पेरी – ₹2 कोटी
  • श्रेयंका पाटील – ₹60 लाख

गुजरात जायंट्स

  • एश्ले गार्डनर – ₹3.5 कोटी
  • बेथ मूनी – ₹2.5 कोटी

यूपी वॉरियर्स

  • श्वेता सेहरावत – ₹50 लाख

दिल्ली कॅपिटल्स

  • जेमिमा रोड्रिग्ज – ₹2.2 कोटी
  • शेफाली वर्मा – ₹2.2 कोटी
  • एनाबेल सदरलंड – ₹2.2 कोटी
  • मारिजन कप – ₹2.2 कोटी
  • निकी प्रसाद – ₹50 लाख

टीमांचा शिल्लक पर्स (ऑक्शनसाठी)

टीम उर्वरित पर्स
यूपी वॉरियर्स ₹14.5 कोटी
गुजरात जायंट्स ₹9 कोटी
RCB ₹6.15 कोटी
मुंबई इंडियन्स ₹5.75 कोटी
दिल्ली कॅपिटल्स ₹5.7 कोटी

 

आता सगळ्यांच्या नजरा ऑक्शन दिवसावर वोल्वार्ट आणि दीप्ती कोणत्या टीमच्या जर्सीत दिसतील? हेच पुढील मोठं आकर्षण ठरेल. 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More