RCBच्या बॉलरनं काढली विराटची विकेट, भारत विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात किवी बॉलरचा ऐतिहासिक विक्रम

कोहलीला आऊट करणाऱ्या बॉलर्सवर संतापले नेटकरी, RCBचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्याची मागणी

Updated: Jun 21, 2021, 02:57 PM IST
RCBच्या बॉलरनं काढली विराटची विकेट, भारत विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात किवी बॉलरचा ऐतिहासिक विक्रम

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला आऊट करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याच्याच आयपीएल टीममधील बॉलर असल्यानं सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. किवीच्या या बॉलरने बॅटिंग लाइनची फळी अशी विस्कटवली आणि एकापाठोपाठ एक सर्वांनाच तंबुत धाडत ऐतिहासिक विक्रम केला. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात किवीचा घातक बॉलक काइल जेमिसननं टीम इंडियाच्या खेळाडूंना गुडघे टेकायला भाग पडलं. इतकच नाही तर आयपीएलमध्ये RCB कडून खेळणाऱ्या आरसीबीच्या काइलनं विराटची विकेट काढली त्यामुळे अजूनच क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. 

सोशल मीडियावर चाहत्यांनी काइल जेमिसनप्रती राग व्यक्त केला. इतकच नाही तर RCBसोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द कऱण्याची मागणी देखील केली. विराट कोहली अवघे 44 रन करून आऊट झाला त्यामुळे लोकांनी हा राग व्यक्त केला. 

काइल जेमिसन हा सर्वोत्कृष्ट आणि घातक बॉलर म्हणून प्रसिद्ध आहे. भारत विरुद्ध कसोटी सामन्यात तो पहिल्यांदाच उतरला असून त्याने 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. इतकच नाही तर आपल्या कसोटी करियरमध्ये 8 सामने खेळून 44 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. या आधी (1937-1949) दरम्यान जॅक कॉइए नावाच्या घातक बॉलरनं कसोटी सामन्यात 41 विकेट्स घेऊन हा विक्रम केला होता. जॅकचा हा विक्रम काइलने मोडला आणि त्याचं कौतुक जगभरात होत आहे.

44- काइल जेमिसन

41 - जॅक कॉइए (1937-1949)

38 - शेन बान्ड (2001-2003)

33 - डग ब्रेसवेल (2011-2012)

32 - हेडली होवर्थ (1969)