)
WTC Points Table : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात 2 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत असून यातील पहिला टेस्ट सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजला दुसऱ्या इनिंगमध्ये 146 धावांवर ऑलआउट करून सामना जिंकला. त्यामुळे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने (Team India) हा सामना एक इनिंग आणि 140 धावांनी जिंकला. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया आता कोणत्या स्थानी आहे याबाबत जाणून घेऊयात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 साठी सर्व देशांच्या संघांमध्ये एक तगडी झुंज सुरु असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ टॉपवर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन टेस्ट सामने खेळले आहेत असून हे तिन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. WTC मधील विजयाने जास्तीत जास्त 12 गुण मिळवले असून, ज्यामध्ये संघाच्या गुणांची टक्केवारी (PCT) 100 टक्के असते. तर पराभूत होणाऱ्या संघांचे पॉईंट्स कापले जातात. ऑस्ट्रेलियाचा संघ तीन पैकी तीन सामने जिंकला असून त्यामुळेच त्यांचा PCT 100 इतका आहे.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर असून आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या सायकलमध्ये टीम इंडियाने 5 सामने खेळले आहेत. या चॅम्पियनशिप अंतर्गत भारताने इंग्लंडविरुद्ध पहिली टेस्ट सीरिज खेळली, ज्यामध्ये टीम इंडियाने 2 सामने जिंकले तर 2 सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. तर वेस्ट इंडिज विरुद्ध सीरिजमधील पहिला सामना भारताने जिंकाय. ज्यामुळे टीम इंडियाकडे आता 55.56 PCT आहेत. त्यामुळे भारत पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.
श्रीलंका पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेला आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला आहे. या संघाने 16 पॉईंट्स असून त्यांचा PCT 66.67 एवढा आहे. त्यामुळे श्रीलंका नंबर 2 वर तर भारत नंबर 3 वर आहे. भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा सामना जिंकल्यास पॉईंट्स टेबलमधील स्थानावर परिणाम होऊ शकतो आणि भारत दुसऱ्या नंबरवर पोहोचू शकतो.
ऑस्ट्रेलिया, PCT- 100
श्रीलंका, PCT- 66.67
भारत, PCT- 55.56
इंग्लैंड, PCT- 43.33
बांग्लादेश, PCT- 16.67
वेस्टइंडीज, PCT- 0.00
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 सायकलची सुरुवात कधी झाली?
WTC 2025-27 सायकलची सुरुवात जून 2025 मध्ये झाली आणि ती जून 2027 पर्यंत चालेल. अंतिम सामना लॉर्ड्स येथे होईल.
सध्याच्या WTC 2025-27 पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 3 संघ कोणते आहेत?
ऑस्ट्रेलिया (PCT 100)
श्रीलंका (PCT 66.67)
भारत (PCT 55.56)
भारताचा WTC 2025-27 मधील सध्याचा रेकॉर्ड काय आहे?
भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले: इंग्लंडविरुद्ध 2 विजय, 2 पराभव, 1 अनिर्णित आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 1 विजय. यामुळे PCT 55.56 आहे.