Yashasvi Jaiswal IPL 2026 Captaincy Update: भारतीय संघाचा दमदार सलामीवीर यशस्वी जयसवाल आता आयपीएलमध्ये नवी भूमिका साकारताना दिसू शकतो. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रँचायझी त्याच्यावर विश्वास दाखवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्स ला आयपीएल 2026 (IPL 2026) साठी नवीन कर्णधार मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. टीमचा विद्यमान कर्णधार संजू सॅमसनने फ्रँचायझीला संघ सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी, यशस्वी जयसवालला टीममध्ये टिकवण्यासाठी कर्णधारपदाची ऑफर दिली गेल्याचं बोललं जात आहे.
चेन्नई सुपर किंग्जसह तीन फ्रँचायझींनी संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय. त्यामुळे पुढील हंगामात राजस्थान रॉयल्स च्या कर्णधारपदासाठी जयसवाल हा सर्वात मजबूत दावेदार ठरू शकतो.
फक्त सॅमसनच नाही तर राजस्थानचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल देखील संघ सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. जुरेलच्या निर्णयामागचं नेमकं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, जयसवालही काही काळासाठी राजस्थान सोडण्याच्या विचारात होता, पण कर्णधारपदाच्या आश्वासनामुळे त्याने फ्रँचायझीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. सॅमसनच्या कारकिर्दीकडे पाहिलं, तर तो 2013 ते 2015 आणि मग 2018 पासून आतापर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी खेळत आहे. त्याने आपल्या 177 IPL सामन्यांमध्ये 4,704 धावा केल्या असून त्यात 3 शतके आणि 26 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याने पूर्वी दिल्ली कॅपिटल्स (तेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्स) साठीही खेळ केला आहे.
हे ही वाचा: Who is Mahieka Sharma: कोण आहे हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड महिका शर्मा? वय वर्ष 24 पण कमाई आहे बक्कळ
IPL 2026 चा मिनी लिलाव डिसेंबर 13 ते 15 दरम्यान पार पडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना आपल्या रिटेन्शन लिस्ट सादर करावी लागणार आहे. यावेळीचा लिलाव, IPL 2025 च्या मेगा लिलावाच्या तुलनेत छोट्या स्वरूपाचा असेल.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.