)
Yuvraj Singh and Robbin Utthapa ED Notice : सुरेश रैना, शिखर धवन या स्टार क्रिकेटरनंतर आता माजी क्रिकेटर युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा हे दोघे ED च्या रडारवर आले आहेत. प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ED ने दोन्ही क्रिकेटरला बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ऍप्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नोटीस पाठवली आहे. याअंतर्गत युवराज सिंहला ED ने 23 सप्टेंबर ला आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं असून रॉबिन उथप्पाला 22 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ऍप्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात यापूर्वी माजी क्रिकेटर्स शिखर धवन आणि सुरेश रैनाची चौकशी करण्यात आली होती. असे मानले जात आहे की एजन्सी या खेळाडूंकडून ऍप्सशी संबंधित व्यवहार आणि संभाव्य आर्थिक क्रियाकलापांबद्दल माहिती गोळा करेल. ईडीचा तपास सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. एजन्सी या बेकायदेशीर ऍप्सच्या प्रमोशनमध्ये खेळाडूंचे नाव किंवा फोटो वापरत होती जेणेकरून ते अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करू शकेल.
ED ने सांगितलं की माजी क्रिकेटर युवराज सिंह, रॉबिन उथप्पा आणि अभिनेता सोनू सूद यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यांचे जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) नोंदवले जातील. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये फसवल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात करचोरी केल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर बेटिंग ऍप्सशी ही चौकशी जोडलेली आहे.
ED ने युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी कधी बोलवलं आहे?
युवराज सिंह: 23 सप्टेंबर 2025 रोजी
रॉबिन उथप्पा: 22 सप्टेंबर 2025 रोजी
यापूर्वी कोणत्या क्रिकेटरांची चौकशी झाली आहे?
यापूर्वी माजी क्रिकेटर सुरेश रैना आणि शिखर धवन यांची या प्रकरणात ED कडून चौकशी करण्यात आली आहे.
या चौकशीचं कारण काय आहे?
ED बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ऍप्सशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांचा संभाव्य सहभाग तपासला जाणार आहे.