Yograj Singh Schoking Statment: भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे विविध कारणांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. योगराज सिंग हे स्वतः माजी क्रिकेटर आहेत आणि सध्या कोच म्हणून सुद्धा काम करतात. मात्र त्यांनी एका मुलाखतीत स्वतःच्या आयुष्याबाबत काही खुलासे करून त्याविषयी दुःख व्यक्त केलं आहे. द विंटेज स्टूडियो सोबत बोलताना योगराज सिंग यांनी मी मरणासाठी तयार आहे आणि देवाने मला लवकर त्याच्याकडे असं म्हणत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. त्यांनी म्हंटले की हे दुःख मी अनेकवर्ष मनात ठेवलं. संभाषणादरम्यान, त्यांनी सांगितलं की ते अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून राहून कंटाळले आहेत आणि आता ते मरण्यास तयार आहेत.
योगराज सिंग यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं की, 'जीवनाच्या एका वळणावर जेव्हा युवराज आणि त्याची आई शबनम हे मला सोडून गेले तेव्हा मला खूप धक्का बसला. ही घटना अतिशय भयानक होती. योगराज सिंग पुढे म्हणाले की ज्या स्त्रीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि तारुण्य समर्पित केले होते ती स्त्री त्यांना सोडून जाऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. तेव्हा बरंच काही उध्वस्त झालं'.
माजी क्रिकेटर योगराज सिंग यांनी म्हंटले की, आता त्यांना जेवणासाठी अनोळखी व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतंय. कधी एकावर तर कधी दुसऱ्यांवर. पण त्यांनी कधीच कोणाला त्रास दिला नाही. पुढे योगराज सिंग म्हणाले की त्यांचं जीवन आता पूर्ण झालंय आणि ते आता मरण्यासाठी तयार आहेत. देवाला जेव्हा वाटते तेव्हा ते त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतो'.
योगराज सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी 1 कसोटी सामना व 6 एकदिवसीय सामने (ODI) भारतासाठी खेळले. पहिल्या श्रेणी क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्यांची कारकीर्द अधिक प्रभावी होती. हरियाणा संघाकडून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुखापतीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लवकर संपुष्टात आली. क्रिकेटनंतर योगराज सिंह यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी 100 पेक्षा जास्त पंजाबी चित्रपटांत काम केलं आहे. क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. ते स्थानिक पातळीवर तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतात.
योगराज सिंग यांचा पहिला विवाह शबनम कौर यांच्याशी झाला. शबनम कौर पासून त्यांना युवराज सिंग आणि झोरावर सिंग अशी दोन मुलं आहेत. युवराज सिंग हा भारताचा दिग्गज क्रिकेटर आहे. योगराज सिंग यांनी शबनम कौर यांना घटस्फोट देत दुसरा विवाह सतवीर कौर यांच्यासोबत केला. दुसऱ्या पत्नीकडून त्यांना अमरजोत कौर आणि विकटोर सिंग अशी दोन मुलं आहेत.
हेही वाचा : मानेला पट्टा, हाताला सलाईन; कॅप्टन शुभमनला डिस्चार्ज, पण Viral Video पाहून चाहते चिंतेत
योगराज सिंह अलीकडे का चर्चेत आहेत?
योगराज सिंह यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भावनिक विधानं केली आणि ते मरणासाठी तयार असल्याचं सांगितल्यामुळे ते चर्चेत आले.
योगराज सिंह यांनी मरणासाठी तयार असल्याचं का म्हटलं?
त्यांनी सांगितलं की आता ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आणि जीवनात खूप दुःख अनुभवल्याने ते मानसिकरित्या थकले आहेत.
युवराज सिंह आणि त्यांच्या आईबाबत योगराज सिंह यांनी काय म्हटलं?
त्यांनी सांगितलं की जीवनाच्या एका टप्प्यावर युवराज आणि त्याची आई शबनम यांनी त्यांना सोडून गेलं, आणि ती घटना त्यांच्यासाठी भयानक होती.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.