)
Yuzvendra Chahal Tshirt Viral Message: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झालाय. दोघांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकालही दिला. त्यानंतर दोघेही कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत. चहल आणि धनश्री यांचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले होते. पण ते बराच काळ वेगळे राहत होते. त्यांच्या नात्यात कटुता येत असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. आता कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली आहे.
घटस्फोटाची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी युझवेंद्र चहल कोर्टात पोहोचला होता. कोर्टाच्या आत जाताना त्याने टी शर्ट आणि त्यावर जॅकेट असा पेहराव केला होता. पण कोर्टातून बाहेर येताना त्याने जॅकेट काढली होती. त्यामुळे त्याचे टी शर्टच फक्त दिसत होते. घटस्फोटानंतर चहल कोर्टाबाहेर येताच पापाराझींनी त्याला घेरले. जिथे तो हातात जॅकेट धरून टी-शर्ट दाखवताना दिसला. त्यावर लिहिलेल्या कोटाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि आता त्याचा टी-शर्ट चर्चेत आहे.
माध्यमांनी चहलला पाहताच त्याला घटस्फोटावर त्याची प्रतिक्रिया विचारली. पण तो लगेचच त्याच्या वकिलांसह तिथून निघून गेला. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा लोकांनी त्याचा टी-शर्ट पाहिला. क्रिकेटपटू चहलने काहीही न बोलता आपला मुद्दा सांगितला, असे नेटकरी म्हणतायत.
चहल काळ्या रंगाचा जॅकेट आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स घालून कोर्टात आला होता. तो मास्क आणि डोक्यावर जॅकेट घालून आत आला. पण जेव्हा तो कोर्टाबाहेर आला तेव्हा तो हातात जॅकेट घेऊन बाहेर पडला होता. ज्यावर पांढऱ्या रंगात लिहिले होते - 'स्वतःचे शुगर डॅडी व्हा'. ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.लोकांचे लक्ष फक्त चहलच्या कपड्यांवर असले तरी तो डायमंड स्टड घालून आला होता. यासोबतच त्याने हातात ब्रेसलेट आणि पांढऱ्या शूज असा गेटअप केला होता. असं सारं असलं तरी इथेही त्याच्या टी-शर्टच्या नावावरच सर्वांच्या नजरा राहिल्या.
चहलचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याचा टी-शर्ट पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देतायत. चहलला काय म्हणायचंय हे त्याने टी-शर्टवर लिहिलंय त्यामुळे त्याला विचारण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिलीय. जेव्हा चहल टी शर्ट घालून कोर्टाबाहेर दिसला तेव्हा मला हसू आवरता आले नाही, अशी प्रतिक्रियाही दुसऱ्या यूजरने दिलीय. तर 'ऑरा म्हणजे काय?' उत्तर- हा टी-शर्ट, अशी प्रतिक्रियादेखील पाहायला मिळतेय.