Yuzvendra Chahal Instagram Story : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्यातील अफेअरच्या चर्चेमुळे सध्या टॉप सर्चमध्ये आहे.दरम्यान चहलच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे.

Yuzvendra Chahal-RJ Mahvash: टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज म्हणजे युजवेंद्र चहल. चहल सध्या आयपीएलमध्ये आपली जादू दाखवत आहे. अफेअर असो किंवा त्याची कामगिरी, चहलची सर्वत्र चर्चा होत आहे. केकेआर विरुद्धच्या सामन्यादरम्यान, त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महविशची चहलची प्रशंसा करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. आता चहलच्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली जी वाऱ्यासारखी पसरली आहे.
केकेआर विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेऊन चहल खूप चर्चेत आला. तेव्हा त्याला खूप प्रसिद्धी मिळवली. सर्वांनी त्याचे भरपूर कौतुक केले होते. आरजे महविशनेही इंस्टाग्रामवर त्याचे एक स्टोरी लिहून कौतुक केले. त्यावेळी तिची ही स्टोरी खूप व्हायरल झाली आणि प्रश्नांची लाट उसळली. त्यानंतर चहलने केलेल्या एका पोस्टने चर्चेला उधाण आले. ती पोस्ट म्हणजे चहलचा पुष्पगुच्छासह सेल्फी फोटोत. या पोस्ट वर चाहत्यांनी विचारले की आरजे महविशने हे पाठवले आहे का? त्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली.

अनेक रेडिट वापरकर्त्यांनी असा दावाही केला की चहलने गुप्तपणे महवशला स्टोरीमध्ये टॅग केले होते. परंतु, याची अजून पुष्टी झालेली नाही. रेडिट पोस्ट व्हायरल होताच, चहलच्या इंस्टाग्रामवर आणखी लोक आले आणि त्यांनी फोटो पाहिला. अनेक नेटकऱ्यांनी रेडिट पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चहलला ट्रोलही केले. अफवा पसरू लागल्यावर, चहलने ती स्टोरी पूर्णपणे डिलीट केली.

आरजे महाविश आणि युजवेंद्र चहल यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. तथापि, महविशने एकदा त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते पण आता दोघांनीही गप्प राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात. चहलला महविशचा प्रत्येक फोटो लाईक करतो आणि बऱ्याचदा तो कमेंटही करतो. आयपीएलमध्ये चार विकेट घेतल्यानंतर महविशने चहलचे खूप कौतुक केले.