अंबरनाथ

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार

अंबरनाथच्या मोरीवली MIDCमध्ये अनथा ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट होउन भीषण आग लागली. यात कंपनीचे मालक सी. नायारण (63) जागीत ठार झालेत. तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आगीत कंपनी पूर्णपणे जाळून खाक झालीये.

Mar 26, 2014, 08:16 AM IST

शाळेत गेला नाही म्हणून पित्यानं केली मुलाची हत्या

अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. आपला चौथ्या वर्गात शिकणारा मुलगा शाळेत गेला नाही म्हणून संतापलेल्या पित्यानं मुलाला जीव जाईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झालाय. तर नातवाच्या अशाप्रकारच्या मृत्यूचा धसका घेतल्यामुळं आजीचाही हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाला.

Mar 24, 2014, 12:13 PM IST

अंबरनाथच्या निशांतला गरज मदतीच्या `हातांची`

विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना आठवीतल्या निशांतला विजेचा मोठा धक्का बसला. या दुर्घटनेत त्याने आपले दोन्ही हात गमावले. मात्र, निशांत खचला नाही.

Feb 11, 2014, 07:40 PM IST

तिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...

अंबरनाथ स्टेशनवर एका महिलेनं धिंगाणा घातल्यानं बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

Nov 7, 2013, 08:26 AM IST

गड सर करण्यासाठी ११७४ मीटरची शिडी

गड सर करण्यासाठी आता शिडीची मदत होणार आहे. हा प्रयोग मलंग गडावर होणार आहे. ११७४ मीटर उंचीची शिडी उभारण्यात येत आहे. त्यामुळे गडावर चढण्यासाठी ही शिडी कामी येणार आहे.

May 7, 2013, 04:27 PM IST

अंबरनाथमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला

अंबरनाथमध्ये खासगी क्लासेस चालकानं दहावीचा बीजगणिताचा पेपर फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Mar 14, 2013, 05:59 PM IST

अंबरनाथमधले सफाई कामगार संपावर

अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.

Feb 21, 2012, 11:39 PM IST

अंबरनाथ वाळेकर हल्ला, शिवसेना नगरसेवकाला अटक

अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर हल्लाप्रकरणाला शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे आणि त्याचा नातेवाईक योगेश ठाकरेला अटक करण्यात आली. या दोघांनाही ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

Dec 14, 2011, 08:16 AM IST

मुलाला मारहाण झाली म्हणून आईचं आत्मदहन

अंबरनाथ शहरात एका महिलेनं मुलाला मारहाण झाली म्हणून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा यादव असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर उल्हासनरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Nov 9, 2011, 05:35 AM IST