आग

दादर फुलमार्केटजवळील गोदामाला आग

गणेशोत्सवामुळं गर्दीनं फुलून गेलेल्या दादरच्या फुलबाजारात आज सकाळी तयार कपड्याच्या गोदामाला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहाय्यानं, दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं, या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

Sep 11, 2013, 11:57 AM IST

बौद्धांनी जाळली मुस्लिम धर्मियांची घरं

धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत.

Aug 25, 2013, 03:37 PM IST

माजी सहकारमंत्र्यांच्या मुलाचा `प्रताप`!

माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या मुलगा धवलसिंह याच्याविरोधात एकाच कुटुंबातल्या तिघांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय़.

Aug 22, 2013, 10:52 PM IST

सिंधुरक्षकच्या स्फोट : पाणबुडीतील सर्व नौसैनिकांचा मृत्यू!

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधीच मुंबईत भीषण नौदल दुर्घटना घडली आहे. नौदलाची 16 वर्ष जुनी सिंधूरक्षक या पाणबुडीमध्ये जबर स्फोट होऊन विध्वंसक आग लागली. आगीमुळे ही पाणबुडी बुडाली असून, त्यावरील तीन अधिका-यांसह 15 नौसेनिंकांचा मृत्यू झालाय.

Aug 14, 2013, 05:08 PM IST

नौदलाच्या पाणबुडीवर स्फोट, १८ कर्मचारी बेपत्ता

मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मंगळवारी रात्री भीषण दुर्घटनेमुळं अफरातफर माजली. नौदलाच्या INS सिंधुरक्षक पाणबुडीला आग लागल्याच्यावृत्तानं सुरक्षा यंत्रणांचं धाबं दणाणलं. पाणबुडीमध्ये झालेल्या या भीषण स्फोटानंतर नौदलाचे किमान 18 कर्मचारी बेपत्ता असल्याचं समजतंय.

Aug 14, 2013, 09:34 AM IST

स्वत:च पेट घेणारं बाळ; डॉक्टरही चक्रावले!

अचानक पेट घेणारे तीन महीन्याचे राहूल नावाचे मूल गुरूवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. या आश्चर्यजनक घटनेने डॉक्टरांनादेखील धक्का बसला आहे.

Aug 12, 2013, 11:13 AM IST

सिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर!

नागपूरच्या फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड परिसरातल्या सिंडीकेट बँकेत आज सकाळी आग लागली होती. आगीचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जातेय.

Jun 3, 2013, 06:06 PM IST

केमस्टार कंपनीला भीषण आग , एकाचा मृत्यू

डोंबिवली MIDC परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागलीय. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत.

May 13, 2013, 09:35 AM IST

पुणेकरांनो सावधान... बंद घरात कधीही लागेल आग!

उन्हाळ्याच्या सुटी मध्ये बाहेर जाताय आणि त्यामुळे तुमचं घर काही दिवसांसाठी बंद राहणार आहे, तर पुणेकरांनो सावधान... कारण तुमच्या बंद घरात कधीही आग लागू शकते. पुण्यात सध्या दररोज असे तीन ते चार प्रकार घडतायत.

May 2, 2013, 06:13 PM IST

मुंबईतील वांद्रे येथे आगीत १५० झोपड्या खाक

वांद्रे भागातील शास्त्रीनगर झोपडपट्टीत बुधवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीत १५० झोपड्या जळून खाक झाल्यात तर १५ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी तैनात पोहोचल्या. मात्र, आग पहाटे आटोक्यात आणण्यात यश आले.

Mar 7, 2013, 11:51 AM IST

औरंगाबाद पालिका आगीत कागदपत्रे खाक

आज सकाळी औरंगाबाद महापालिकेच्या इमारतीला अचानक आग लागली. या आगीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र जळाली आहेत.

Feb 5, 2013, 01:14 PM IST

स्थानिकांनी लावली अनधिकृत झोपडपट्ट्यांना आग

मुलुंडच्या नीलमनगर परिसरातील अनधिकृत झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे स्थानिकांबरोबर सर्वपक्षिय पदाधिका-यांनी या कारवाईत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

Jan 20, 2013, 04:00 PM IST

मुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग

मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यात. घाटकोपर येथे बसला तर गोरेगावमध्ये एका हॉटेलला आग आगली. आगीत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Jan 7, 2013, 03:06 PM IST

जॉली मेकर्स चेम्बरमध्ये १९ व्या मजल्यावर आग

मुंबईतल्या कफ परेड भागातल्या जॉली मेकर्स चेम्बरमध्ये १९ व्या मजल्यावर आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. ही आग विझवण्यासाठी जवळजवळ तीन ते साडेतीन तास लागले.

Dec 2, 2012, 09:46 AM IST

उरणमध्ये गोदामाला आग

पनवेल-उरण मार्गावरील जासई गावाजवळच्या आकृती वेअर हाऊसच्या गोडावूनला आज दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा करण्यात आला होता.

Dec 1, 2012, 11:13 PM IST