एसटीची ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ
राज्यात एसटीचे ७ मार्चपासून भाडे वाढणार आहे. याबाबतची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. सर्वसामान्यांच्या एस.टी.ने ७ मार्चपासून २.५४ टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. ३१ किलोमीटरनंतर ५४ किलोमीटरपर्यंत १ रुपया तर ५५ ते ९० कि.मी.पर्यंत २ रुपये आणि ९१ ते १५० कि.मी.करिता ३ रुपये अशी भाडेवाढ असेल.
Mar 5, 2014, 10:32 AM ISTएसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध
एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.
Feb 13, 2014, 09:59 PM ISTचला नोकरीची संधी: एसटीची भरती प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती प्रक्रिया हाती घेतलीय. त्या अनुषंगानं एसटीतर्फे जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे असून अर्जाची नोंदणी करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी २०१४ ही आहे.
Feb 5, 2014, 10:25 AM ISTएसटी १ हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खड्डयात
राज्यातील ग्रामीण वाहतूक व्यवस्था आजारी पडण्याची शक्यता आहे. कारण एसटी एक हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खोल खड्ड्यात गेली आहे.
Jan 28, 2014, 09:43 PM ISTखुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी
आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
Jan 14, 2014, 03:26 PM ISTओव्हरटेकच्या नादात एसटीची ट्रकला धडक, चार ठार
माळशेज घाटात दरीत एसटी कोसळून झालेल्या अपघाताला दोन दिवसही उलटले नाहीत तोच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरजवळ आज पुन्हा एक एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय.
Jan 5, 2014, 02:39 PM ISTखुशखबर : ‘एसटी’मध्ये नोकरीची संधी!
नवीन वर्षात एसटी महामंडळानं एक खुशखबर दिलीय. आत्तापर्यंत एकदा नोकरभरती झाली की पुढचे चार-पाच वर्ष स्थगित राहणारी नोकरभरती यंदाच्या वर्षापासून दरवर्षी आणि तेही नियमितपणे होणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय.
Jan 1, 2014, 11:41 AM ISTव्हील रॉड तुटला... रस्त्यावरच पलटली एसटी, ८ जखमी
रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.
Dec 2, 2013, 01:53 PM ISTसोनिया गांधींच्या सभेवेळी विदर्भवादी नेत्यांची घोषणाबाजी
काँग्रेसच्या अ्ध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेच्या दरम्यान नागपुरात आज विदर्भवादी नेत्यांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या नेत्यांनी सोनियांची सभा सुरु असताना मैदानात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांमुळे तो अयस्वी ठरला.
Nov 21, 2013, 10:21 PM ISTसोनियांच्या सभेला एसटी महामंडळच दावणीला, अनेकांचे हाल
नागपूरमध्ये आज झालेल्या सोनिया गांधींच्या सभेचा मोठा फटता एसटी महामंडळाच्या वाहतुकीला बसला. या सभेत कार्यकत्यांना आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने चक्क १५०० पेक्षा जास्त बसेस बुक केल्या होत्या. एकट्या चंद्रपूर विभागातूनमधून काँग्रेसने ५४६ आरक्षित केल्या होत्या. या गाड्या कमी पडल्यानेर आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतूनही गाड्या मागविल्या. त्यामुळे राजकीय शक्ती दाखवण्याच्या या अट्टहासाचा फटका चंद्रपूरसह विदर्भातील प्रवाशांना बसला.
Nov 21, 2013, 06:01 PM ISTएसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.
Nov 7, 2013, 07:52 PM ISTएसटीचा चेहरा आता फेसबूकवर
एसटीने आपला स्मार्ट लूक दाखवण्यास सुरूवात केली आहे. एसटीने आपल्या ताफ्यात होल्वो, शिवनेरी गाड्याची भर टाकली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन युक्त्या सुरू केल्या आहेत. मुंबई ते गोवा एसटी गाडी सुरू केली आहे आणि आता त्याही पुढे पाऊल टाकत एसटीने आता फेसबुकची कास धरत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. एसटी फेसबूकच्या माध्यमातून तुमच्या भेटीला.
Sep 4, 2013, 05:12 PM ISTमराठा आरक्षणाचा राग, एसटीच दिली पेटवून
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी एसटीला टार्गेट केले. आपला राग एसटीवर काढून गाडीच पेटवून दिली.
Sep 4, 2013, 09:03 AM ISTकोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे, एसटी
गणेशोत्सवात कोकणमध्ये जाण्यासाठी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने कोकणात जाण्यासाठी आणखी जादा रेल्वे सोडल्या आहेत. तसेच मुंबईबाहेर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी सहा जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळ १८०० जादा बसेस सोडणार आहे.
Aug 29, 2013, 12:11 PM ISTपनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!
राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.
Jul 25, 2013, 10:24 AM IST