चॅम्पियन्स ट्रॉफी बातम्या

Virat Kohali Record: भारत - पाक सामन्यात विराट कोहलीने रचला इतिहास, दिग्गज खेळाडूला टाकलं मागे

Most Catches in ODI For India, IND vs PAK : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई येथे सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले. या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये इतिहास रचला. 

Feb 23, 2025, 07:53 PM IST

पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळायला उतरण्याआधीच रोहितच्या नावावर नकोसा विक्रम; पहिल्यांदाच असं घडलं की...

Champions Trophy 2025 : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकला. 

Feb 23, 2025, 03:08 PM IST

पाकिस्तान सोडा, टीम इंडियासाठी पुढचा पेपर अधिक अवघड! आजच्या सामन्यानंतर भारत सेमी-फायनलमध्ये कसा पोहोचणार?

Champions Trophy 2025 Semi Final Qualification Scenario: 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला असून आतापर्यंत स्पर्धेतील चार सामने झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक विरोधी संघांमध्ये खेळवला जाणार असून या हायव्होल्टेज   सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

Feb 23, 2025, 02:30 PM IST

IND VS PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला! महामुकाबल्यात रोहित शर्माने 'या' खेळाडूंनी दिली प्लेईंग 11मध्ये संधी

IND VS PAK Champions Trophy 2025 : २३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात स्पर्धेचा पाचवा सामना पार पडणार असून दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी २ वाजता पार पडला.

Feb 23, 2025, 02:09 PM IST

पाकिस्तानच्या कोचचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज! भारत Vs पाक सामन्यापूर्वी केलेल्या वक्तव्याने उडाली खळबळ

Champions Trophy 2025 India vs Pakistan: पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार असताना त्यांचा अहंकार काही कमी होत नसल्याचं दिसतंय. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे कोच आकिब जावेद यांनी टीम इंडियाला खुलं चॅलेंज दिलंय. 

Feb 23, 2025, 11:57 AM IST

भारत विरुद्ध पाकिस्तान: महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी, 'हे' दोन खेळाडू पडले आजारी

India vs Pakistan, Champion Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीला अवघे काही तास उरले आहेत. याआधीच टीम इंडियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली होती की, एका स्टार खेळाडूची तब्येत अचानक बिघडली, तर दुसऱ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. 

Feb 23, 2025, 10:06 AM IST

पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?

Champions Trophy 2025 :  जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली. 

Feb 22, 2025, 06:16 PM IST

पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप

IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.

 

Feb 22, 2025, 08:31 AM IST

Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिकासमोर आज अफगाणिस्तान, कोण मिळवणार विजय? जाणून घ्या सामन्याचे डिटेल्स

South Africa vs Afghanistan Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीमवर नजर टाकली तर साऊथ आफ्रिकेचं पारडं नक्कीच जड दिसत आहे.

 

Feb 21, 2025, 02:05 PM IST

मोहम्मद शमीचा बांगलादेशला जोरदार पंच, वनडेत सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा जगातला पहिला गोलंदाज

Mohammad Shami : दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून इतिहास रचला आहे. बांगलादेशच्या तब्बल ५ खेळाडूंना माघारी धाडत शमीने टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं. यासह सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. 

Feb 20, 2025, 06:50 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video

Champions Trophy 2025 : ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पदरी पराभव आल्याने सध्या पाकिस्तानचा संघ अडचणीत आलाय. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये भर मैदानातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

Feb 20, 2025, 01:24 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महासंग्रामाला सुरुवात! पाकिस्तान टॉस जिंकला, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंचा समावेश

Champions Trophy 2025 :  तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत असून भारताचे सर्व सामने मात्र दुबईत खेळवले जातील. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात झाली असून या सामन्याचा टॉस पार पडला.

Feb 19, 2025, 02:12 PM IST

टीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी

Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

Feb 19, 2025, 01:06 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट

Champions Trophy 2025 :  यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Feb 19, 2025, 12:11 PM IST

टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला

Champions Trophy 2025, Morne Morkel Father Death: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. यामुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली आहे. 

Feb 18, 2025, 12:13 PM IST