मुंबईकर अजिंक्यची पहिली-वहिली टेस्ट सेन्चुरी!
मुंबईकर अजिंक्य रहाणेनं वेलिंग्टन टेस्टमध्ये आपल्या बॅटिंगनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. त्यानं आपल्या करिअरमधील पहिली सेंच्युरी झळकावली.
Feb 15, 2014, 07:55 PM IST<B> <font color=red>प्रीव्ह्यू : </font> भारत विरुद्ध द. आफ्रिका डर्बन टेस्ट </b>
पहिल्या रंगतदार टेस्टनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकन टीम डर्बन टेस्टकरता सज्ज झालेत. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारतीय टीमने बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र, बॉलिंग डिपार्टमेंटने टीमची कसोटी पाहिली.
Dec 25, 2013, 05:24 PM ISTझहीर फॉर्मात... ३०० विकेटस् पूर्ण!
टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर झहिर खाननं टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. आफ्रिकेचा बॅट्समन जॅक कॅलिस त्याचा टेस्टमधील ३०० वा शिकार ठरला आहे.
Dec 22, 2013, 09:11 PM ISTसचिन संघात नसल्याचं सत्य पचवावंच लागेल - धोनी
‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय.
Dec 18, 2013, 08:17 AM ISTसुरु होणार धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट!
महेंद्रसिंग धोनीच्या यंगिस्तानची खरी टेस्ट सुरु होईल ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये. जोहान्सबर्गमध्ये भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिली वन-डे रंगणार आहे. होम अॅडव्हानटेज डिव्हिलियर्सच्या टीमला असणार आहे. त्यामुळं धोनी अँड कंपनी आपल्या पहिल्याच पेपरमध्ये पास होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 4, 2013, 03:26 PM IST<B> <font color=red>वेळापत्रक</font></b> : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात धूळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मॅचसाठी टीम इंडिया सज्ज झालीय. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये तीन वनडे आणि दोन सामने खेळणार आहे.
Dec 4, 2013, 01:23 PM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर झेपावलीय. रविवारी आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीयादीत भारतीय संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. पहिल्या स्थानाचा मान दक्षिण आफ्रिकेनं पटकवला आहे.
Dec 2, 2013, 07:29 PM IST<B> <font color=red> निरोप : </font></b> सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.
Nov 16, 2013, 04:08 PM ISTसचिन तेंडुलकरला द्या, खास शुभेच्छापर प्रतिक्रिया...
मुंबईचा लाडका सचिन. क्रिकेटचा देव. मास्टर. मास्टर ब्लास्टर. बॉलरचा कर्दनकाळ. अनेक विक्रम आपल्या पायाजवळ आणले. सचिनची २००वी कसोटी. तीही शेवटची. पुन्हा सचिन आपल्याला मैदानावर दिसणार नाही. त्याला निरोप देताना चाहते भावूक झाले.
Nov 16, 2013, 12:32 PM ISTटीम जिंकली...पण सचिनच्या डोळ्यात पाणी
तिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि सचिन तेंडुलकरने हातात स्टंप घेऊन दोन्ही हात उंच पसरवून वानखेडेवरील त्याच्या चाहत्यांना सामोरा गेला खरा. पण सचिनच्या डोळ्यात अश्रु दाटलेच. त्यामुळे स्टेडियमवर सन्नाटा पसरला.
Nov 16, 2013, 12:08 PM ISTसचिन विश्व : एकिकडे क्रिकेटप्रेमींचा सलाम आणि दुसरीकडे निराशा
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर सेंच्युरी पाहायला न मिळाल्यानं सचिन चाहते निराशा झाले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७४ रन्सवर आऊट झाला. आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये मास्टर इनिंग खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींनी त्याला सलाम ठोकला. त्याच्या या इनिंगमध्ये १२ फोरचा समावेश होता.
Nov 15, 2013, 02:27 PM ISTऑस्ट्रेललियाविरूध्द कोहली, धोनीची शतके
ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना तिसऱ्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर विरोट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदात शतके झळकावलीत.
Feb 24, 2013, 03:26 PM ISTइंडियाची हाराकिरी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारली आहे. टीम इंडियाची हाराकीरी दिसून आली. सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरला आहे. १३ रन्स करून तंबूत परतला आहे. ५०० रन्सचं आव्हान टीम इंडियाला आता पेलणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पराभवाकडे वाटचाल असल्याचे दिसून येत आहे.
Jan 27, 2012, 03:36 PM ISTरिकी पॉन्टिंगचे अर्धशतक
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १५४ रन्सच्या बदल्यात ५ विकेट गमावल्या आहेत. तर रिकी पॉन्टिंगने अर्धशतक केले.
Jan 27, 2012, 01:06 PM ISTटीम इंडियाला पहिला धक्का
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव १६७ रन्सवर घोषित केला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर ५०० रन्सचे टार्गेट आहे.
Jan 27, 2012, 11:30 AM IST