टेस्ट

ऑस्ट्रेलिया आणि व्दिशतके....

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली आहे. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली आहे. टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.

Jan 27, 2012, 08:17 AM IST

विराटचे शतक, इंडिया ऑलआऊट

टीम इंडियाच्या विराट कोहलीने झुंजार शतक फटकावून टीमला नवा सूर दाखवून दिला आहे. कसोटी कारर्कीदीतील विराटचे पहिले शतक आहे. ऑस्ट्रेलियात सचिन, लक्ष्मण, द्रविड, सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंनी नांगी टाकली असताना विराट खेळी करून टीम इंडियाची इज्जत राखली आहे.

Jan 26, 2012, 02:57 PM IST

विराटची खेळी, साहा आऊट

विराट कोहली आणि बुध्दीमान साहाने शतकी भागिदरी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या ६ बाद २२५ रन्स झाल्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने साहाची विकेट घेवून पुन्हा एक जोरदार धक्का दिला.

Jan 26, 2012, 11:33 AM IST

सचिन आऊट, विराटचे अर्धशतक

अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. १४५ रन्सवर ५ विकेट गेल्या आहेत.

Jan 26, 2012, 10:28 AM IST

बॉलर्स चमकले, बॅटसमन ढेपाळले

सिडनी टेस्टमधील आजचा पहिला दिवस गाजवला तो बॉलर्सने. आजच्या संपूर्ण दिवसात टेस्टच्या पहिल्याच दिवशी १३ विकेट गेल्या. त्यामुळे टेस्टमधील चुरस वाढणार हे नक्की सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर ३ विकेट्स गमावून ११६ रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु टीम इंडियाच्या अजून ७५ रन्स पिछाडीवर आहेत.

Jan 3, 2012, 01:29 PM IST