...आणि दलाई लामा यांनी रामदेव बाबांची दाढी खेचली
योगगुरू रामदेव बाबा जेव्हा व्यासपिठावर असतात तेव्हा आपल्या कलाकारीने सर्वांचे लक्ष ते सहज वेधून घेतात. पण यावेळेस असा काही प्रसंग घडला की रामदेव बाबा क्षणभरासाठी विचारात पडले. हा प्रसंग मुंबईत घडला. जेव्हा धर्मगुरू दलाई लामा आणि योगगुरू रामदेव बाबा एकाच व्यासपिठावर होते. त्यावेळी दलाई लामा यांनी रामदेव बाबांना स्वत: कडे बोलावून घेतले आणि ते जवळ आल्यावर त्यांची दाढी खेचली.
Aug 13, 2017, 05:07 PM ISTदलाई लामा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर, चीनचा तिळपापड
चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करुन घेतला नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला सुनावलं आहे. सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. त्यामुळे तिळपापड झालेल्या चीननं बिजिंगमध्ये भारतविरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली आहे.
Apr 5, 2017, 10:12 PM ISTसलमानने घेतली दलाई लामांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 01:37 PM ISTबराक ओबामांनी घेतली दलाई लामांची भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल बौद्ध धर्माचे गुरु दलाई लामा यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. ओबामा आणि दलाई लामा यांच्या भेटीवर चीनने आक्षेप घेतला होता. यामुळे चीन-अमेरिकेचे संबंध बिघडतील, असा इशारा चीनने दिला होता. ओबामांनी याकडे दुर्लक्ष करत दलाई लामांची भेट घेतली.
Jun 16, 2016, 05:27 PM ISTभारताकडून चीन अधिक शिकू शकेल : दलाई लामा
तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारत व चीनमधील संबंध हे शांततापूर्ण आणि अधिक विकसित व्हावेत असा आशावाद व्यक्त केला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांनी हे वक्वव्य केलं आहे.
Sep 18, 2014, 02:44 PM ISTदलाई लामांनी केलं बाबांच्या आदोलनाचं कौतुक
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचं तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी कौतुक केलंय. हिंसा आणि भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. आसाम आणि त्यानंतर सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचाराचाही दलाई लामा यांनी निषेध केलाय..
Aug 14, 2012, 08:49 AM IST