पाणी कपात

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात पाणी कपात

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30 टक्के पाणीकपात आजपासूनच लागू करण्यात आली आहे. 

Oct 21, 2015, 04:50 PM IST

ठाण्याच्‍या प्रस्‍तावित पाणी कपातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

 ठाण्याच्‍या प्रस्‍तावित 40 टक्‍के पाणी कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपा शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज घेतली भेट 

Oct 6, 2015, 06:24 PM IST

मुंबईत २० टक्के पाणी कपात

पावसानं पाठ फिरवल्यामुळं मुंबईवर पाणी कपातीचं संकट अधिक गडद झाले आहे. आता मुंबईत आज रात्रीपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर व्यापाऱ्यांसाठी ५० टक्के पाणीकपात लागू असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Aug 26, 2015, 03:43 PM IST

पावसाची दांडी; 'पाणी... पाणी' करण्याची वेळ येणार?

राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर  दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय. पावसाअभावी कोकणातलं भातशेतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत. इथं दुबार पेरणीची पाळी शेतकऱ्यांवर येणार, अशी चिन्हं दिसतायत.

Jun 26, 2014, 11:48 AM IST

पुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून

कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Oct 17, 2013, 03:26 PM IST

धरणं भरलेली; तरीही पुण्याला एकवेळ पाणी…

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तरीही पुणेकरांना एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय.

Oct 15, 2013, 08:37 PM IST

मनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात

मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Mar 23, 2013, 09:36 PM IST

सेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण

नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.

Feb 11, 2013, 09:26 PM IST

धरणं तुडुंब भरली, तरी पाणी कपात राहाणारच!

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.

Oct 9, 2012, 06:09 PM IST

मुंबईकरांना आज अजिबात पाणी नाही...

मुंबईत आज काही भागात १०० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर काही भागात अंशतः पाणीकपात करण्यात आली आहे. पाईपलाईन जोडण्याच्या कामामुळं ही पाणीकपात करण्यात आली आहे.

May 7, 2012, 10:39 AM IST

नाशिकमध्ये पाणीकपातीवरून राजकारण

नाशिकमध्ये पाणीकपातीच्या मुद्यावरून राजकारण सुरू झालंय. नागरिकांना पाणी मिळण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर जुलैपर्यंत टिकेल इतका पाणीसाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.

Mar 31, 2012, 05:46 PM IST

मुंबईत २५% पाणी कपात

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

Jan 5, 2012, 09:49 AM IST

मुंबईत ५० % पाणी कपात

मुंबईकरांना शनिवारी १९ नोव्हेंबरला पन्नास टक्के पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे.

Nov 17, 2011, 07:34 AM IST