पाणी

पाण्यापासून मोबाईल जपण्याच्या काही टीप्स

आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.

Jul 15, 2014, 04:11 PM IST

'पाणी म्हणजे पैका...'; पण, सरकार भिकारी!

तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय राज्य सरकारला लागलीय. यंदा पावसानं ओढ दिल्यानं राज्यात तीव्र पाणीटंचाईचं संकट उभं राहिलंय. पाण्याचं दूरगामी नियोजन करावंसं सरकारला वाटतंय, पण ते टंचाई निर्माण झाल्यावर... राज्यातील पाण्याचं नियोजन करण्यात जलसंपदा खातं कसं कमी पडतंय, हे आता उघड झालंय.

Jul 15, 2014, 01:06 PM IST

जायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी

जायकवाडी ते औऱंगाबाद पाणीपुरवठ्याचा मार्ग आहे त्या मार्गातील 1300 पैकी निम्म्याहून अधिक व्हॉल्व नादुरुस्त आहेत..औरंगाबाद शहराची रोजची गरज 200 एमएलडी पाण्याची आहे. मात्र पाणीपुरवठ्याची यंत्रणा फक्त 156 एमएलडी पाणीपुरवठा करू शकते इतकीच आहे .30 एमएलडी पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जातेय.. रोजचा 30 एमएलडीचा विचार केला तर वर्षाला 10950 एमएलडी पाण्याचा अपव्यय होतोय.. नियमानुसार प्रति व्यक्ती 135 लिटरपाणी पुरवणं आवश्यक आहे मात्र औरंगाबादेत हे पाणी प्रति व्यक्ती 70 लिटर इतकच मिळतय..

Jul 5, 2014, 02:49 PM IST

औरंगाबादमध्ये पाण्याची बोंबाबोंब

औरंगाबाद तसा पाण्याचा नेहमीचाच ठणठणाट.. शहराला तीन दिवसाआड तर, कुठे 4 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र औरंगाबाद महापालिकेच्या घोडचुकीमुळे रोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही... जायकवाडी ते औरंगाबाद या मार्गावर हजारो लिटर पाण्याची नासाडी दिवसरात्र सुरुय... मात्र महापालिका आता दुष्काळाच्या नियोजनाच्या गप्पा मारतेय...

Jul 5, 2014, 02:44 PM IST

धक्कादायक, मुंबईला पुरवठा होणाऱ्या पाण्याची २७ टक्के चोरी

मुंबईकरांना सध्या वीस टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागतं असलं तरी मुंबईला पुरवठा होणा-या पाण्यापैकी सुमारे 27 टक्के पाण्याची चोरी आणि गळती होतं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं पाणी चोरी आणि गळतीवर नियंत्रण मिळवलं असतं तर पाणीकपात झेलण्याची ही वेळ मुंबईकरांवर आली नसती.

Jul 4, 2014, 12:14 PM IST

राज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट

 राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली. 

Jul 1, 2014, 12:35 PM IST