भारत

'शाहरूख राहतो भारतात, पण मन पाकिस्तानात'- कैलास विजयवर्गीय

असहिष्णुतेवरून देशभरात सुरू असलेल्या वादामध्ये आता भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांची भर पडलीय. 'अभिनेता शाहरूख खान राहतो तर भारतात पण त्याचं मन पाकिस्तानात असल्याचं' विजयवर्गीय म्हणालेत. 

Nov 4, 2015, 09:21 AM IST

हाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण

'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.        

Nov 4, 2015, 09:13 AM IST

छोटा राजनला आज रात्री भारतात आणणार, मुंबई पोलिसांचा घेतलाय धसका

कुख्यात माफिया डॉन छोटा राजनला आज रात्री उशिरा इंडोनेशियातून भारतात आणलं जाणार आहे. मात्र आपणाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती छोटा राजननं केलीय. छोटा राजनला मुंबई पोलिसांचीच भीती का वाटतेय? हा खास रिपोर्ट

Nov 3, 2015, 04:19 PM IST

छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ

भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी आता पाकिस्ताननं दहशतवादी-गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केलीय. 

Nov 3, 2015, 10:37 AM IST

नेपाळ भारत सीमेवरील गोळीबारात भारतीयाचा मृत्यू; भारताकडून चिंता

भारत - नेपाळ सीमेवर तणाव निर्माण झालाय. नेपाळमधील भारतीय सीमारेषेपासून जवळ असलेल्या बिरगुंज शहरामधील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केलेय.

Nov 2, 2015, 10:08 PM IST

२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग

भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.

Oct 31, 2015, 09:28 PM IST

गरीब देशाचा धनाढ्य राजा : 15 पत्नी, 30 मुलांसहित भारतात दाखल!

 भारत - आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आफ्रिकन देश असलेल्या स्वाझीलँन्डचा राजा भारतात दाखल झालाय. राजा मस्वाती (तृतीय) हे एकटे आलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या 15 राण्या, 30 मुलं आणि 100 नोकरदेखील आहेत. 

Oct 30, 2015, 09:08 AM IST

नेपाळ, अफगाणनंतर आता भारताला भूकंपाचा धोका

हिमालयातील प्रदेशात भूगर्भात साठणाऱ्या ऊर्जेमुळे नेपाळ, आफगाणिस्ताननंतर  भारतात भूकंपाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. देश आणि विदेशातील भूगर्भ संशोधकांचे म्हणणे आहे की, हिमालयातील परिसरात मोठ्या प्रमाणात मुख्यत्वे भूमिगत ऊर्जा स्टोअर होत आहे. त्यामुळे भविष्यात याचा धोका आहे.

Oct 29, 2015, 05:18 PM IST

काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

रविवारी इंडोनेशियात तावडीत सापडलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनबद्दल अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच छोटा राजनच्या संपत्तीबद्दलही माहिती समोर आलीय. जगभरात छोटा राजननं जवळपास चार हजार करोडहून अधिक संपत्ती जमा केलीय.

Oct 29, 2015, 04:58 PM IST

भारत पाकिस्तानला घाबरतो, जावेद मियाँदादनं ओकली गरळ

पाकिस्तानचा माजी कॅप्टन जावेद मियाँदादनं बीसीसीआयवर टीका केलीय. सरकारच्या इशाऱ्यावर बीसीसीआय निर्णय घेत असल्याचा आरोप मियाँदादनं केला. 

Oct 29, 2015, 11:56 AM IST

मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन

इंडोनेशियाच्या बालीमध्ये अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं भारतात परतण्याची इच्छा दर्शवली. पण त्यानं सरेंडर केलं नसल्याचंही त्यानं कबुल केलं.

Oct 29, 2015, 10:29 AM IST

हाफिज सईद, बिन लादेन पाकिस्तानचे हिरो - परवेझ मुशर्रफ

हाफिज सईद, बिन लादेन पाकिस्तानचे हिरो - परवेझ मुशर्रफ

Oct 28, 2015, 11:26 AM IST

भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!

भारतात सुविधा नाही; सतनामची भारतात खेळण्याची इच्छाच मेली!

Oct 28, 2015, 10:52 AM IST

परवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत!

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदशी करून नवा वाद ओढवून घेतालाय.  

Oct 28, 2015, 10:38 AM IST