सोळाव्या लोकसभेसाठीचं मतदान संपन्न
सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील 41 जागांसाठीचे मतदान आज पार पडले. लोकसभा निवडणुकीचं मतदान एकूण सात टप्प्यात घेण्यात आलं. यावेळेसही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान पार पडलं आहे.
May 12, 2014, 06:23 PM ISTलोकसभा निवडणुकीचा नववा आणि अंतिम टप्पा
लोकसभा निवडणुकीसाठी नवव्या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होतंय. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतील 41 लोकसभा मतदारसंघात आज मतदानाचा फुल अँड फायनल टप्पा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, मुलायमसिंग यादव, कलराज मिश्र, जगदंबिका पाल, प्रकाश झा अशा दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
May 12, 2014, 08:39 AM ISTलोकसभा निवडणूक : मोदी, केजरीवाल, अजय राय यांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली असून या टप्प्यात जवळपास ९ कोटी मतदार ६,०६० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. यामध्ये वाराणशीत भाजपाचे नरेंद्र मोदी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अजय राय यांची कसोटी आहे.
May 12, 2014, 07:53 AM ISTगांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांचं भवितव्य मतपेटीत बंद
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील 64 जागांसाठीच मतदान पूर्ण. गांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांसह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद.
May 7, 2014, 07:20 PM ISTमोदींच्या सभेसाठी वाराणसीत मैदान नाही, परवानगी नाकारली
देशात आज आठव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. १२ तारखेला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडेल. तेव्हा नरेंद्र मोदींच्या वाराणसी इथंही मतदान होणार आहे. त्या अगोदर उद्या नरेंद्र मोदी वाराणसीत सभा घेणार आहेत. मात्र ही सभा आता परवानगीच्या कचाट्यात सापडली आहे.
May 7, 2014, 02:59 PM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTस्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगींचं मतदान
हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये श्याम नेगी यांनी मतदानाचा हक्क आज बजावला हिमाचल प्रदेशातील 97 वर्षांचे श्याम नेगी यांनी देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ते आतापर्यंत मतदान केलं आहे.
May 7, 2014, 01:14 PM ISTलोकसभा निवडणूक : आठव्या टप्प्यातलं मतदान बुधवारी
लोकसभा निवडणुकीसाठी आठव्या टप्प्यातलं मतदान बुधवारी होतंय. त्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. निवडणुकीआधीचा काल रविवारी सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.
May 5, 2014, 08:48 AM IST... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी
उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.
May 2, 2014, 01:21 PM ISTमोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान
ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.
Apr 30, 2014, 02:18 PM ISTचिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध
केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.
Apr 30, 2014, 01:18 PM ISTलोकसभा निवडणूक : यांनी बजावला मतदानाचा हक्क
भाजप अध्यक्ष राजनाथ सिंहांनी लखनऊमध्ये मतदान केलं. राजनाथ सिंह आणि काँग्रेसच्या रिटा बहुगुणामध्ये बिग फाईट आहे. तर गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणा-या लालकृष्ण अडवाणींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.
Apr 30, 2014, 12:16 PM ISTबहुमताचा २५ वर्ष जुना रेकॉर्ड तोडणार - मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथे आपलं मतदान केलं. मोदींनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ गांधीनगरसाठी मतदान केलं. गुजरातच्या सर्व २६ लोकसभा जागांवर आज मतदान आहे आणि मोदी स्वत: बडोद्यावरून निवडणूक लढवतायेत.
Apr 30, 2014, 10:42 AM ISTदहा प्रमुख लढती : मोदी, सोनिया गांधी, अडवाणींचे भवितव्य पणाला
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. आज दहा महत्वाच्या ठिकाणी दिग्गज उमेदवार असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी किती टक्के मतदान होते, याची उत्सुकता आहे.
Apr 30, 2014, 10:22 AM ISTमाचिसच्या काडीनं मिटवता येते मतदानाची शाई!
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचं दोनदा मतदान करण्याचा सल्ला तुम्हीही ऐकलाच असेल... पण, बोटांवर शाई असताना दुसऱ्यांदा कसं मतदान करणार? हा त्यांना न पडलेला सल्ला तुम्हाला जरुर पडला असेल...तर
Apr 29, 2014, 09:27 PM IST