शेअर बाजाराच्या घडामोडींवर नजर - रघुराम राजन
शेअर बाजारातल्या मोठ्या चढ-उतारांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून असल्याचं बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केलंय. काल त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. अर्थमंत्र्यांनी शेअर बाजारातल्या घडामोडींबाबत सावध केलंय.
May 14, 2014, 08:04 AM ISTआता कोणत्याही बँकेत बदलू शकता २००५ पूर्वीच्या नोटा
आता आपण देशातल्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जावून २००५ पूर्वीच्या नोटा (५०० आणि १००० सह) बदलू शकता. १ जानेवारी २०१५पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत की सामान्य नागरिकांची जुन्या नोटांपासून सुटका होण्यासाठी त्यांची मदत करा. विशेष म्हणजे नोट बदलण्याच्या संख्येची कोणतीही सीमा नाहीय.
Mar 18, 2014, 08:32 AM ISTलक्ष द्या... नोटांवर काही लिहिताय, सांभाळा!
आपलं भारतीय चलन नोटांवर काही लिहू नका, नोटांवर न लिहिण्याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांनी वाराणसी इथं दिली. मात्र १ जानेवारीपासून ज्यावर लिहिलं आहे अशा नोटा बँकेत घेतल्या जाणार नाही, ही अफवा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Dec 1, 2013, 04:07 PM ISTरिझर्व्ह बँकेची रेपोदरात ०.२५ टक्के वाढ, गृहकर्ज महागणार
रिझर्व्ह बॅंकेचे आज पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रेपोदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे माहिती बॅंकेचे गव्हर्नर गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. रेपोदरात झालेल्या दरवाढीमुळे गृहकर्ज वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2013, 01:56 PM ISTबाजारासाठी `रॉकस्टार` ठरले रघुराम राजन!
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर लगेचच बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलेत. गुरुवारी बाजाराची सुरुवात एका नव्या जोमात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत.
Sep 5, 2013, 11:08 AM ISTरघुराम राजन आज स्वीकारणार पदभार!
केंद्रीय अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम गोविंद राजन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारतील. विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची जागा ते घेतील. ५० वर्षीय राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त होणारे सर्वात कमी वयाचे अधिकारी आहेत.
Sep 4, 2013, 11:34 AM ISTरुपयाचं पतन सुरूच; गाठली सर्वांत खालची पातळी!
थोडाफार सावरतोय अशी चिन्हं दिसता-दिसताच रुपया पुन्हा एकदा धडामदिशी खाली आदळलाय. मंगळवारी शेअरबाजार आणि रुपयाच्या मूल्यासाठी अनलकी ठरलाय.
Aug 27, 2013, 12:38 PM ISTगृहकर्ज ३० वर्षांसाठी मिळालं तर...
रिझर्व्ह बँकेनं नेमलेल्या एका समितीनं होम लोनसाठी ३० वर्षांचा कालावधी आणि फिक्स दरांच्या स्कीम्सची शिफारस केलीय.
Jan 24, 2013, 04:42 PM ISTआरबीआयच्या घोषणा: टीकावू की दिखाऊ
देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध्ये मोठी सूट देण्यात आली. शेअर बाजाराने मात्र या बदलांना नकारात्मक प्रतिसाद दिलाय, तर रुपयाचीही घसरण झालेली दिसून आली.
Jun 26, 2012, 08:25 AM ISTचेक, ड्राफ्ट तीन महिनेच वैध
धनादेश (चेक) आणि ड्राफ्टच्या वैधतेची मुदत सहा महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं.
ग्राहकांना पुढील वर्षी १ एप्रिल पासून चेक आणि ड्राफ्ट तीन महिन्यांच्या आत बँकेत जमा करावे लागतील.
रिझर्व्ह बँकचा व्याजदरवाढ बॉम्ब
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वाढीशी तडजोड करून व्याजदरात पाव टक्का वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Oct 25, 2011, 06:36 AM IST