24taas

भाजपनं बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे

गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का? असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते. 

Oct 2, 2014, 04:37 PM IST

गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करू - गडकरी

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचं ते म्हणाले. 

Oct 2, 2014, 12:10 AM IST

जयंत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले

इस्लामपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. 

Oct 1, 2014, 09:34 PM IST

दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय. 

Oct 1, 2014, 09:15 PM IST

मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

Oct 1, 2014, 08:34 PM IST

नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य

नाशिक शहरातल्या 4 मतदारसंघात आज उमेदवारीच्या माघारीवरून चांगलंच नाट्य रंगलं. तब्बल 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं अनेकांनी सुस्कारा टाकला तर काही ठिकाणी माघार न घेतल्यानं ताणतणाव होता. मतविभागणीनेच विजय सुकर होणार असल्यानं प्रचारापेक्षा आज सर्वांचंच लक्ष्य राजकीय घडामोडींकडे लागलं होतं.

Oct 1, 2014, 08:21 PM IST

मोदींची पहिली सभा कोल्हापूरलाच का?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिला जाहीर सभा कोल्हापूरात होणार आहे. भाजपनं मोदींच्या पहिल्या सभेसाठी पश्चिम महाराष्ट्राची निवड करण्यामागची अनेक कारणं असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शक्तीस्तळावर आघात करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

Oct 1, 2014, 08:02 PM IST