`बाळासाहेबांची इच्छा अपूर्णच, आपण तरी काय करणार!`
‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलीय.
Feb 13, 2013, 03:24 PM IST‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली. यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
Feb 9, 2013, 12:24 PM ISTबाळासाहेबांना आदरांजली... आपणही द्या बाळासाहेबांना आदरांजली
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. तर शिवसेनेतर्फेही बाळासाहेबांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली आहे.
Jan 23, 2013, 11:35 AM ISTबाळासाहेब ठाकरेंची जयंती, सेनेची खास आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी भारतीय चित्रपट सेनेने एक चित्रफित तयार केली आहे.
Jan 23, 2013, 09:20 AM ISTबाळासाहेबांसारखा नेता होणे नाही- रतन टाटा
टाटा समुहाचे प्रमुख असणाऱ्या रतन टाटांनी नुकतीच निवृत्त स्वीकारली. त्यानंतर त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
Jan 13, 2013, 01:40 PM ISTबाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे- शरद पवार
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. बाळासाहेबांचं राज्याला मोठं योगदान आहे, असंही ते म्हणाले.
Jan 7, 2013, 11:53 PM ISTचौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आज बाळासाहेबांच्या महानिर्वाणाला एक महिना पूर्ण होतोय.
Dec 17, 2012, 02:37 PM ISTसेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरू हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
Dec 14, 2012, 06:35 PM ISTअबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध
समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.
Dec 11, 2012, 03:56 PM ISTशिवाजी पार्कचं कायद्यानुसार नामांतर करू - सेना
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. तर वरिष्ठ नेते या प्रकरणी निर्णय घेतील अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं शिवसेनेच्या समस्येत भर पडलीय.
Dec 11, 2012, 10:57 AM ISTलष्कर घेणार शिवाजी पार्कचा ताबा
दादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामकरण करण्यावरून जोरदार विरोध झालाय. त्यातच शिवाजी पार्कचा ताबा लष्कर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2012, 10:11 AM ISTशिवाजी पार्कवरील वीट हलवू देणार नाही - राऊत
मुंबईतील शिवाजी पार्क हे आमच्यासाठी शक्तिस्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील अंत्यसंस्काराची जागा ही तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमींसाठी शक्तिस्थळच आहे. येथील एकही वीट हलवू देणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
Dec 9, 2012, 04:04 PM IST‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही, असा शिवसेनेने सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या जागेचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 8, 2012, 12:44 PM ISTबाळासाहेबांवर अंत्यसंस्कार केलेला चौथरा सेना हटवणार?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद चांगलाच रंगला होता. अनेक राजकीय पक्षाकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात होत्या.
Dec 5, 2012, 12:15 PM ISTबाळासाहेबांच्या नावे मुंबईत आरोग्य विद्यापीठ!
मुंबईत आता मुंबई महापालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचे आरोग्य विद्यापीठ स्थापन करणार आहे. या विद्यापीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
Dec 3, 2012, 09:36 AM IST