balasaheb thackeray

बाळासाहेब स्मारकाबाबत सेनेची मवाळ भूमिका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मारकाचा वाद आता निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
शिवाजी पार्कमध्ये स्मारक व्हावं, असा शिवसेनेने आग्रह धरला नव्हता, असे शिवसेना नेते खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुले सेनेची मवाळ भूमिका दिसत आहे.

Dec 2, 2012, 03:23 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच कायम - उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची शब्दापलीकडील नात्याची वीण त्यांच्या निधनानंतरही घट्ट असल्याने त्यांच्या पश्चातही शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेबच कायम राहणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
लाखो शिवसैनिकांची भावना लक्षात घेता आपण त्यांची जागा घेणार नाही. कार्यकारी अध्यक्षपदावरच राहू. पुढील घोडदौड सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.

Dec 2, 2012, 09:39 AM IST

हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख होणार तरी कोण?

हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे.

Dec 1, 2012, 05:15 PM IST

बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मात्र बाळासाहेबांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय.

Nov 26, 2012, 12:25 AM IST

बाळासाहेबांचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याशेजारी?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्याशेजारी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतल्या सर्वपक्षिय नेत्यांच्या समितीनं तयार केलाय. महापौर बंगल्याशेजारी एका क्लबला भाडेपट्टीवर दिलेली जागा आहे. ही लीज संपलेली असल्यानं त्या जागेत बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाऊ शकतं.

Nov 25, 2012, 03:08 PM IST

राज ठाकरेंना झाले अश्रू अनावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. ते अंत्यविधी सुरू असताना ढसाढसा रडत होते.

Nov 18, 2012, 07:36 PM IST

राज ठाकरे चालले पायी!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये समस्त ठाकरे कुटुंबिय सहभागी झाले. परंतु, बाळासाहेबांचे पार्थिव असलेल्या रथामध्ये राज ठाकरे नव्हते. राज ठाकरे यांनी रथाऐवजी रथासमोर पायी चालण्याचा निर्णय घेतला.

Nov 18, 2012, 03:37 PM IST

बाळासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुंबई बंद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजतात काही मिनिटात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झालेत. परळ, दादर, लालबाग, माहिम, गिरगाव अशा मराठीवस्तीच्या भागात शोकाकूळ वातावण होते. येथील वेगाने विविध दुकाने, मॉल्स, बाजार बंद झाले. दरम्यान, सावधगिरीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी मुंबईभरात कडक बंदोबस्त ठेवला होता.

Nov 17, 2012, 07:42 PM IST

बाळासाहेबांच्या नाडीचे, हृद्याचे ठोके व्यवस्थित सुरू

शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचा निर्वाळा आज सकाळी दिला.

Nov 17, 2012, 12:35 PM IST

बाळासाहेबांच्या भेटीसाठी अभिनेत्यांनी लावली रीघ

बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं.

Nov 16, 2012, 04:28 PM IST

आपला `देव` नक्कीच संकटातून बाहेर पडणार - उद्धव

आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत शिक्कामोर्तब केलंय.

Nov 15, 2012, 11:16 PM IST

बाळासाहेबांशी काय बोलावं सुचलंच नाही, शरद पवार भावूक

केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. शरद पवार हे भेटीसाठी `मातोश्री`वर गेले होते.

Nov 15, 2012, 02:29 PM IST

`संकट आहे, मात्र बाळासाहेब नक्कीच मार्ग काढतील`

शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच चिंता वाटत असल्याने अनेकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेत आहेत.

Nov 15, 2012, 01:33 PM IST

बाळासाहेबांच्या आठवणीने मनोहर जोशी गहिवरले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रकृती गंभीर असल्याने शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह इतरही नेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती.

Nov 15, 2012, 12:35 PM IST

गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल

गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल झालेत. बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यापासून राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये.

Nov 15, 2012, 09:18 AM IST