breaking news

Student Kidnap In Satara Sainik School PT33S

Video| साताऱ्याच्या सैनिक शाळेतील विद्यार्थ्याचं अपहरण

Student Kidnap In Satara Sainik School
सातारा सैनिक स्कूलमधील 11 वर्षीय मुलाचं अज्ञातानं अपहरण केलंय. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मित्रासोबत फिरायला गेल्यानंतर ही घटना घडली असल्याचं समोर आलंय. सहावीमध्ये शिकत असलेला हा विद्यार्थी 28 ऑगस्टपासून बेपत्ता आहे. मित्रासोबत साता-यात फिरायला गेला होता. त्यावेळी तो बेपत्ता झाला. शोधूनही तो सापडत नसल्यानं त्याच्या मित्राने सैनिक स्कूलमध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली.

Aug 30, 2022, 11:00 AM IST
Mega Recruitment in Govt Departments PT1M37S

Video| सरकारी नोकरीची सुवर्णसंधी इतक्या हजार पदांसाठी होतेय भरती

Mega Recruitment in Govt Departments
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यात जंबो मेगाभरती होणार आहे. पोलिसांसह तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लॅन तयार केलाय. त्यासंदर्भात काल सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृहविभागातील 7 हजार पदांवरही 15 सप्टेंबरपासून भरती सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे

Aug 30, 2022, 10:55 AM IST
MNS will also hold Dussehra gathering PT1M37S

Video| महाराष्ट्र नवनिर्माण सेना दसरा मेळावा घेणार?

MNS will also hold Dussehra gathering
शिवतीर्थवर दसरा मेळावा कोण करणार याची उत्सुकता आहे. त्यात आता मनसे देखील दसरा मेळावा करणार का असा प्रश्न निर्माण झालाय. ...

Aug 30, 2022, 10:45 AM IST
There will be a change in the entire process of MHADA lottery PT1M50S

Video| म्हाडाच्या सोडतीमध्ये होणार आता नवा बदल

There will be a change in the entire process of MHADA lottery

Aug 30, 2022, 08:20 AM IST
Eknath Shindes focus on Mumbai municipal elections PT1M13S

Video | एकनाथ शिंदे यांचे मिशन BMC इलेक्शन

Eknath Shindes focus on Mumbai municipal elections
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्यायत. यात मुंबईसाठी 5 विभागप्रमुख तर 3 विभाग संघटकाना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलीय. मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेह-यांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली. या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या सर्व जणांना पक्षविस्ताराचं काम सुरू करण्यास सांगण्यात आलंय. ((याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर नव्यानं या नियुक्त्या जाहीर झाल्यानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील

Aug 30, 2022, 08:15 AM IST