breaking news

Petrol-Diesel चे दर किती वाढले? झटपट चेक करा तुमच्या शहरांतील दर

सरकारी तेल कंपन्यांकडून आज (25 ऑगस्ट) सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जारी करण्यात आले. मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात....

Aug 25, 2022, 09:01 AM IST
Transport Department Warning To Private Travellers PT52S

Video| प्रवाशांची लूट कराल तर याद राखा! परिवहन विभागाचा खासगी ट्रॅव्हल्स चालकांना इशारा

Transport Department Warning To Private Travellers
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन त्यांची लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सधारकांना परिवहन विभागाने इशारा दिलाय...तिकिटाच्या दीड ते दोन पट भाडे आकारून प्रवाशांची लूट केल्यास खासगी ट्रॅव्हल्सधारकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे...कोकणात जाणा-या चाकरमान्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतल्याचं निदर्शनास आलंय...जिथे 700 ते 800 रुपये भाडं आहे तिथे 1500 ते 1600 रुपये भाडं आकारलं जातंय...पण, आता ट्रॅव्हल्सवाल्यांनी अधिकचं भाडं घेतल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार करावी...यामुळे सणासुदीत होणारी प्रवाशांची लूट थांबण्यास मदत होईल...

Aug 25, 2022, 08:40 AM IST
Salary of government employees will be on 29th August PT49S

Video| सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 29 ऑगस्टला होणार

Salary of government employees will be on 29th August

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालीय. त्यापार्श्वभूमीवर सरकारनं सरकारी कर्मचा-यांना खुशखबर दिलीय. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणारेय. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणारेय. शासनानं यासंदर्भात काल परिपत्रक काढलं.

Aug 25, 2022, 08:35 AM IST
There is a possibility of a decision in the court on the power struggle in the state PT50S

Video| सत्ता राहणार की जाणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होण्याची दाट शक्यता

There is a possibility of a decision in the court on the power struggle in the state
सत्ता संघर्षासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अद्याप सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या यादीमध्ये हे प्रकरण समाविष्ट केलेलं नाही... घटनापीठात कोण कोणते न्यायमूर्ती असणार हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र घटनापीठ स्थापन झाल्यानंतर केवळ केंद्रीय निवडणूक आयोगासंदर्भात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देता येऊ शकते का, याच मुद्द्यांवर सुनावणी होईल. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल देऊ नये अशी विनंती ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दोन दिवस निर्णय घेऊ नका असे तोंडी निर्देश दिले होते...

Aug 25, 2022, 08:30 AM IST
75 thousand government jobs will be available in a year PT1M36S

Video| या वर्षात 75 हजार सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार!

75 thousand government jobs will be available in a year
नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी... वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणारेय. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली. राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाईंनी उत्तर दिलं. एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आलीय.तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणारेय.

Aug 25, 2022, 07:50 AM IST
Today is the last day of the Monsoon Session of the Legislature PT34S

Video | विधीमंडळच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

Today is the last day of the Monsoon Session of the Legislature
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे, याला मुख्यमंत्री उत्तर देतील. हे उत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे..

Aug 25, 2022, 07:45 AM IST
51 thousand quintal of paddy was washed away in the flood PT2M17S

Video | 51 हजार क्विंटल धान पुरात गेलं वाहून

51 thousand quintal of paddy was washed away in the flood

Aug 24, 2022, 03:10 PM IST
Kolhapur MNS Protest on the issue of toll plaza PT6M40S

Video| कोल्हापुरात मनसे आक्रमक! किणी टोल नाका बंद करण्याची मागणी

Kolhapur MNS Protest on the issue of toll plaza

किणी टोल नाक्यावर मनसेनं जोरदार धडक देत आंदोलन केलं.... टोल नाक्यांच्या आंदोलनाबद्दल काल राज ठाकरेंनी मेळाव्यात इशारा देताच मनसे आक्रमक झालीय. मनसे कार्यकर्ते किणी टोलनाक्यावर पोहोचले आणि टोलनाक्यावर बँडबाजा वाजवायला सुरुवात केली. टोल नाका रद्द करावा अशी मनसेची मागणी आहे.... त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं.

Aug 24, 2022, 02:20 PM IST