breaking news

AJAB-GAJAB: अविश्वसनीय! मृत घोषित केल्यानंतर 12 तासांनी चिमुरडीनं डोळे उघडले आणि मग...

12 तासांनंतर एक चमत्कार घडला आणि पालकांच्या आयु्ष्यात आनंद पुन्हा परतला. 

Aug 24, 2022, 12:59 PM IST
Vidhan bhavan Rada Live NCP MLA Amol Mitkari Raction after clashes between Opponent PT3M19S

Video| विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा! अमोल मिटकरी यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Vidhan bhavan Rada Live NCP MLA Amol Mitkari Raction after clashes between Opponent
विधिमंडळाच्या पाय-यांवर अभूतपूर्व राडा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अजित पवारांनी मिटकरींना रोखलं आणि मिटकरींना पुढे जाण्याच्या सूचना केल्या.

Aug 24, 2022, 12:35 PM IST
Vidhan bhavan Rada Live Shinde Camp MLA Bharat Gogawale Raction after clashes between Opponent PT6M7S

Video| "जो येईल अंगावर त्याला घेणार शिंगावर" आमदारांच्या धक्काबुक्कीनंतर भरत गोगावले आक्रमक

Vidhan bhavan Rada Live Shinde Camp MLA Bharat Gogawale Raction after clashes between Opponent
आमच्या अंगावर कोणी आला तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला. आम्ही घोषणा देत असताना ते मध्ये का आले असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही जशास तसं उत्तर दिलंय. आमचा नाद करायचा नाही असं गोगावले म्हणाले.

Aug 24, 2022, 12:00 PM IST
shinde Camp MLA Clashes with Opponent  VidhanSabha Rada live PT6M42S
In Amravati's Melghat, laborers received electricity bills of one lakh rupees PT2M43S

Video | धक्कादायक! मजुरांना आलं एक लाख रुपयांचे विजेचं बिल

In Amravati's Melghat, laborers received electricity bills of one lakh rupees
महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा धक्कादायक अनुभव मेळघाटात येतोय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात रोजगार हमी योजनेत मजुरी करणाऱ्या आदिवासींना साठ हजार ते एक लाख रुपयाचं वीजबिल देण्यात आलंय. हे वीजबिल तीन दिवसात न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित केला जाईल अशी धमकी देण्यात आलीय. सहा गावातील आदिवासींनी अचलपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. चिखलदरा तालुक्यातील आकी, मोरगड, चौऱ्यामल, काकादरी, पिपादरी, सक्ती, रुईफाटा या गावातील दीडशेवर आदिवासींना अशी बिलं आली आहेत. प्रत्येक महिन्याची बिलं भरत असतानाही लाखांची बिलं आल्याने आदिवासी संतापलेत.

Aug 24, 2022, 11:10 AM IST

CHILDS MAKEUP: तुम्ही लहान मुलीला मेकअप करताय? आताच सावध व्हा, नाहीतर...

तुम्ही नकळत मुलांच्या हट्टीपणाला बळी पडता आणि त्याचा आरोग्याला नुकसान पोहोचवता.

Aug 24, 2022, 11:06 AM IST
Protest by the rulers on the steps of the Vidhan Bhavan PT4M46S

Video| विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन

Protest by the rulers on the steps of the Vidhan Bhavan
- विधिमंडळाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांचं आंदोलन
- भाजप-शिंदे गटाची पवार, ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
- बॅनर्स हातात घेऊन विरोधकांवर टीकास्त्र
- 'बीएमसीचे खोके...मातोश्री ओके' सत्ताधा-यांची घोषणाबाजी
- लवासाचे खोके...बारामती ओके सत्ताधा-यांची घोषणाबाजी

Aug 24, 2022, 11:05 AM IST
The ghee that comes into your home is adulterated PT47S

Video| तुमच्या घरी येणारं तूप भेसळयुक्त?

The ghee that comes into your home is adulterated
गौरी गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल तर सावधान... कारण मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तुपाची विक्री करणारी टोळी पकडलीय. अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलीय. घाऊक व्यापा-यांकडून एकूण 7 लाख 38 हजारांचं तूप जप्त करण्यात आलंय. बेकरीची नियमित तपासणी करताना त्याठिकाणी वापरण्यात येणा-या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले. त्याची पुण्यातल्या राज्य आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. त्यातून हे वनस्पती तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलं.

Aug 24, 2022, 10:40 AM IST
A case has been filed against Lifeline Company in Mumbai Police PT1M4S

Video| सुजीत पाटकरांच्या लाईफ लाईन कंपनीविरोधात गुन्हा दाखल! पाटकर संजय राऊतांचे पार्टनर

A case has been filed against Lifeline Company in Mumbai Police
संजय राऊतांच्या अडचणी वाढणार आहेत. संजय राऊतांचा पार्टनर सुजित पाटकरच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खोटी कागदपत्रं दाखवून, फसवणूक करून मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जंबो कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याचा ठपका सुजित पाटकरच्या कंपनीवर आहे. त्यांच्या अक्षमतेमुळे अनेक कोविड रूग्णांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आलाय. आता संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागणार आहे.

Aug 24, 2022, 10:35 AM IST
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena  Supreme Court Refers Petitions To Constitution Bench PT2M15S

Video| शिवसेना कुणाची? पाच सदस्यांचे घटनापीठ करणार फैसला

Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench

राज्यातल्या सत्तासंघर्षाचा तिढा आता सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ सोडवणार आहे. उद्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिंदे सरकारच्या घटनात्मक वैधतेवर घटनापीठ निर्णय घेईल. तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्हं असलेला धनुष्यबाण कोणाकडे राहील याबाबत निवडणूक आयोगाने 25 ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ नयेत असे निर्देशही कोर्टाने दिलेत.

Aug 24, 2022, 09:50 AM IST
Brahmos misfire case 3 indian Air force officers terminated PT47S

Video| ब्राम्होस मिसफायर प्रकरणी हवाई दलाईची मोठी कारवाई

Brahmos misfire case 3 indian Air force officers terminated
ब्रम्होस क्षेपणास्त्र मिसफायर प्रकरणात भारताच्या हवाई दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोषी आढळलेल्या हवाई दलातील तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. क्षेपणास्त्र मिसफायरच्या घटनेनंतर जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. तसेच पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपामुळे भारताने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. त्या चौकशीत दोषी आढळलेल्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडर या तीन अधिका-यांना बडतर्फकरण्यात आलंय. मार्चमध्ये भारताचे ब्रम्होस क्षेपणास्त्र एका चुकीमुळे पाकिस्तानात जाऊन कोसळले होते. त्या प्रकरणी हवाई दलाने जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई केली...

Aug 24, 2022, 09:45 AM IST