cabinet minister

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुरेश प्रभू भाजपमध्ये!

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी आज सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

Nov 9, 2014, 05:24 PM IST

खडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात. 

Nov 1, 2014, 12:48 PM IST

मुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका

मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

Dec 12, 2013, 07:40 AM IST

राहुल गांधीना केंद्रात मंत्रीपद?

काँग्रेस महासचिव राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. येत्या रविवारी मंत्रीमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे.यावेळी राहुल यांचे मंत्रीपद निश्चीत होण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2012, 03:50 PM IST