careful

सावधान, टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी

उन्हाळ्यात गारवा मिळावा यासाठी ताक,सरबत बरोबर टरबूज शहाळीची मागणी वाढते. नैसर्गिक शीतलता देणारे पदार्थ म्हणून या फळाकडे बघितले जाते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये हीच टरबूज खाल्ल्याने लहान मुले आजारी पडतायेत. गेल्या दोन आठवड्यात चाळीस ते पन्नास मुलांना याची बाधा झालीये.

May 8, 2015, 04:12 PM IST

'ऑनलाईन गर्भपात' म्हणजे जीवाला घात!

इंटरनेट हे जर वरदान ठरतंय तसंच त्याचा चुकीचा वापर केल्यास ते शापही ठरतं... इंटरनेटमुळे सगळं जगचं तुमच्यासमोर एका क्लिकमध्ये उभं राहतं... तंत्रज्ञानात विकास होत असला तर सावधान राहणं गरजेचं आहे, असं डॉक्टर आवाहन करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली मुली लग्नापूर्वीच गर्भवती झाल्यानं यातून सुटका करून घेण्यासाठी त्या इंटरनेटवर गर्भपातासाठी औषधं शोधून घेतात... आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च गर्भपात करून घेतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे. 

Dec 31, 2014, 05:45 PM IST

सावधान! मेलेला सापही चावू शकतो

जिवंत साप घातक असतो हे तर आपल्या सर्वांनाच माहितीय, मात्र मेलेला साप सुद्धा खूप घातक असतो. सापांमध्ये मेल्यानंतर अनेक तास चेतना असते. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ अरकांसासचे प्राध्यापक स्टीवन बीऑपरनं सांगितलं, 'साप मेल्यानंतरही त्याच्या शरीरात असलेलं आयन सक्रीय असतं, जे की सापांच्या चेतापेशींमध्ये असतं. '

Sep 2, 2014, 05:33 PM IST