chief minister

मुख्यमंत्र्यांचे पाच अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचे संकेत

मुंबई महानगर भागात आर्थिक क्षेत्रांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी BKCसारखे आणखी पाच आर्थिक केंद्र सुरु केले जातील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

Feb 12, 2015, 04:23 PM IST

फडवणीस सरकारला १०० दिवस, टोल मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा युटर्न

राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. मात्र शंभर दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्यावरुन युटर्न घेतला आहे.

Feb 7, 2015, 05:21 PM IST

भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला सेवामुक्त करा - मुख्यमंत्री फडणवीस

भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

Feb 3, 2015, 08:17 PM IST

अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बरळलेत. अपंग व्यक्ती म्हणजे देवाची चूक असून सामाजिक संस्था ती चूक दुरुस्त करतात असं धक्कादायक विधान पार्सेकर यांनी केलंय.

Jan 23, 2015, 01:38 PM IST

शिवसेना - भाजप यांच्यातील नवा वाद, मुख्यमंत्री टार्गेट

शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशाराही दिलाय. आम्ही मराठी माणसावर अन्याय खपवून घेणार नाही. नाहीतर आम्ही संघर्ष करु, असा इशारा शिवसेनेने दिलाय. त्यामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील नवा वाद पुढे आलाय.

Jan 23, 2015, 08:36 AM IST

पुण्यात मॅकडोनल्डवर शेण फेकले, मुख्यमंत्री करणार चौकशी

फास्ट फूड चेन मॅकडोनल्डमधून एका गरीब मुलाला कॉलर धरून बाहेर काढल्यानंतर पुणेकरांनी आंदोलन केले. मॅकडोनल्डवर शेण फेकले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. 

Jan 17, 2015, 11:02 PM IST

अन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची भावना - मुख्यमंत्री फडणवीस

विदर्भावर राज्यकर्त्यांकडून सातत्यानं अन्याय झाल्यामुळे वेगळ्या विदर्भाची भावना तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. 

Dec 19, 2014, 06:32 PM IST

मुंबईला कोणाचे पूज्य पिताश्री तोडू शकत नाही - मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रापासून मुंबईला कोणाचेही पूज्य पिताश्री तोडू शकणार नाहीत. मुंबई कालही महाराष्ट्रात होती. आजही आहे आणि यापुढेही ती महाराष्ट्रातच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

Dec 16, 2014, 12:20 PM IST

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या काम सुरु होण्याआधीच राजकीय श्रेयाची स्पर्धा लागली आहे. स्मारकासाठी सर्व परवानगी घेऊन भाजप सरकार हे स्मारक पूर्ण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. त्याचवेळी काँग्रेस सरकारने पूर्वीच या स्मारकाच्या सगळ्या पूर्तता केल्या आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Dec 6, 2014, 11:51 AM IST

छोट्या मित्रपक्षांना पुढील विस्तारात स्थान - मुख्यमंत्री

भाजपच्या छोट्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात स्थान देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.दरम्यान, रामदास आठवले यांनी नाराज जानकर, सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर केली जाईल. आम्ही त्यांची समजूत काढू असे स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री त्यांना फोन करतील असेही स्पष्ट केले.

Dec 6, 2014, 10:28 AM IST