कोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
May 5, 2014, 10:44 AM ISTसंतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या
बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
Mar 12, 2014, 07:08 PM ISTअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Feb 23, 2014, 11:36 PM ISTराज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे
राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.
Feb 13, 2014, 11:12 AM ISTCM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट
निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.
Feb 7, 2014, 05:13 PM ISTCM साठी आठ वर्षे प्रलंबित रस्ता एका रात्रीत चकाचक
एरव्ही रस्ते कोणी दुरुस्त करायचे यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाब्दीक चकमक होत असते. पण दापोलीत कृषी विभागाच्या कार्यक्रमाला राज्यपाल के शंकर नारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय आले आणि जिल्हा परिषदेचा रस्ता सार्वजनिक विभागानं एकदम डांबर टाकून चकाचक केला.
Feb 7, 2014, 03:46 PM ISTमहापालिकेकडून काहीतरी शिका... टोल रद्द करा; शेवाळेंची मागणी
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.
Jan 22, 2014, 12:30 PM ISTआदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा - अजित पवार
आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय़ मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.
Dec 26, 2013, 01:36 PM ISTअशोक चव्हाणांवर कारवाईसाठी तावडेचे राज्यपालांना पत्र
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.
Dec 24, 2013, 05:42 PM ISTआदर्श अहवालाचे आमदारांनी केलेत तुकडे, विरोधक न्यायालयात जाणार
आदर्श अहवालावरून विरोधक आक्रमक झालेत. राज्य सरकारने आदर्श अहवालाबाबत घेतलेल्या चालढकल भूमिकेनंतर विरोधकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू केला आहे. सरकारनं मांडलेला आदर्श अहवाल फाडून विरोधकांनी सरकारचा निषेध केला. नागपूरला विधानभवनाच्या आवारातच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या अहवालाचे तुकडे केले.
Dec 20, 2013, 10:15 PM IST<b><font color=red>आदर्श घोटाळाः</font></b> तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे
वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.
Dec 20, 2013, 03:15 PM IST‘आता नरेंद्र मोदी दाढी, मिशी काढणार का?’
...तर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणखी स्मार्ट दिसलीस, असे मत बॉलिवूडची अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने व्यक्त केलं आहे. त्यासाठी मोदींनी दाढी, मिशी काढायला हवी, असं चकीत करणार विधान चित्रांगदा हिने केलंय.
Dec 18, 2013, 09:22 PM ISTबरं का, मुंबईतील मेट्रो जानेवारीअखेर धावणार
मुंबईतील मेट्रोला कधी मुहूर्त मिळणार, असा नेहमी प्रश्न विचारला जातो. मात्र, हा प्रश्न आता विरावा लागणार नाही. दोन ते तीनवेळा घेण्यात आलेल्या चाचणीनंतर मेट्रो आता २०१४च्या जानेवारी अखरेपर्यंत धावण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेत.
Dec 11, 2013, 08:16 AM ISTसमुद्रातील महाराजांच्या स्मारकाला परवानगी
मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण खात्याने तत्वतः परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी दिली.
Jun 21, 2013, 04:43 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत
पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.
Jun 17, 2013, 03:24 PM IST