election

लोकसभा निवडणुकीत भाजपची स्टार पॉवर मैदानात

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. माजी केंद्रीय मंत्री आणि चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांना पंजाबमधल्या गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्यात आलीय.

Mar 26, 2014, 10:59 AM IST

निवडणुकीच्या तोंडावर गॅस सिंलेडर्सची दरवाढ टळली

गॅस सिलेंडरची दरवाढ १ एप्रिलपासून करण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय. आयोगानं याबाबत पेट्रोलियम सचिवांना पत्र लिहलंय.

Mar 25, 2014, 01:11 PM IST

परेश रावल यांचे चित्रपट दाखवू नका- काँग्रेस

चित्रपट अभिनेते आणि अहमदाबाद-पूर्व मधील भाजप उमेदवार परेश रावल यांचे चित्रपट दूरचित्रवाणीवरुन दाखवण्यास मनाई करावी, अशी मागणी गुजरात काँग्रेसच्या कायदा विभागानं केलीय.

Mar 25, 2014, 09:08 AM IST

भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग बंडाच्या पवित्र्यात

भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांना बारमेरमधून भाजपचं तिकीट नाकारण्यात आल्यानं ते आता बंडाच्या पवित्र्यात असल्याचं समजतंय. भाजपाला सोडसिठ्ठी देण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येतायत.

Mar 22, 2014, 05:30 PM IST

अबब... नंदन निलकेणी ७,७००,००,००,००० रुपयांचे मालक!

७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती...

Mar 21, 2014, 04:59 PM IST

निवडणुकांच्या काळात `डिटेक्टीव्ह` एजन्सी फॉर्मात!

`प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं...` असं म्हणतात आणि निवडणुका म्हटल्या की, त्या काही युद्धापेक्षा कमी नसतात. युद्धामध्ये शत्रूच्या गोटातील माहिती काढण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते.

Mar 20, 2014, 09:47 AM IST

लोकसभा निवडणूक : भाजप उमेदवारांची चौथी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. तर विद्यमान भाजप अध्यक्ष रामनाथ सिंग यांना लखनऊमधून रिंगणात उतरविले आहे.

Mar 15, 2014, 11:23 PM IST

नार्वेकरांच्या माघारी : गोष्ट पडद्यामागची...

शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय.

Mar 14, 2014, 10:45 AM IST

रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात

जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रायगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीतेंची तटकरेंशी लढत रंगणार आहे.

Mar 13, 2014, 05:45 PM IST

सुरेश खोपडे हे`आप`चा हिट फॉर्म्युला, बारामती करणार सर?

लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रीतील उमेदवारांसाठी ही तिसरी यादी आहे. या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत. मात्र, खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Mar 12, 2014, 10:08 PM IST

‘आप’ची मुंबईत तोडफोड, चौकशी करणार – आर आर

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा आणि लोकलमध्या प्रवासाचा गोंधळ चर्चगेट स्टेशनवर दाखल झाल्यानंतरही कायम होता. उत्साही कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणेची तोडफोड केली. या तोडफोडीची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Mar 12, 2014, 05:37 PM IST

लोकसभा निवडणूक : `आप`ची पाचवी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्याचवेळी `आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत.

Mar 12, 2014, 04:30 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्यूला बदलला!

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बदलला गेलाय. आता काँग्रेस २७ तर राष्ट्रवादी काँग्रेस २१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं एक पाऊल मागे जात हातकणंगलेची जागा काँग्रेससाठी सोडलीय.

Mar 8, 2014, 08:02 PM IST

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ९ मार्चला जाहीर होणार आहे.

Mar 7, 2014, 08:09 PM IST

केजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?

अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.

Mar 6, 2014, 11:04 AM IST