election

...आणि अजित पवार भडकले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केलीये. राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावल्यानं अजित पवार नाराज झालेत.

Jan 25, 2012, 09:00 AM IST

निवडणूक कर्मचा-यांना मारहाण

पुण्यात आचारसंहिताभंग करुन राजकीय नेते थांबलेले नाहीत, तर निवडणूक कर्मचा-यांना मारहाणीपर्यंत त्यांची मजल गेलीय. निवडणूक कर्मचा-यांना मारहाण आणि कॅमेरा फोडण्याचा प्रकार पुण्यात घडलाय. काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घाटे यांनी ही प्रताप केलाय.

Jan 21, 2012, 07:31 AM IST

उमा भारती निवडणूक रिंगणात

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक रिंगणात आता उमा भारती भाजपकडून निवडणूक लढविणार आहेत. बुदेलखंड जिल्ह्यातील चारखारी येथून उमा भारती निवडणूक लढविणार आहेत.

Jan 19, 2012, 12:07 PM IST

संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्या विरोधात निवडणुकीतील गैरप्रकारांबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Jan 19, 2012, 08:13 AM IST

'बाबा-अण्णा' प्रचारासाठी एकत्र

भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.

Jan 18, 2012, 02:01 PM IST

प्रियांका राजकारणात सक्रीय

काँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

Jan 17, 2012, 03:34 PM IST

नाराजी, बंड आणि तोडफोड

महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.

Jan 13, 2012, 05:07 PM IST

राज ठाकरेंवर उद्धव यांचे तोंडसुख

मुंबईत बंडखोरीचं निशाण नको, असं भावनिक आवाहन शिवसैनिकांना करत, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटनेत्यांच्या मेळाव्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुकलं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले.

Jan 11, 2012, 11:37 AM IST

कोकणात प्रचाराचं रणशिंग

रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही शिवसेनेनं रत्नागिरीतून सुरूवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या नाटेगावातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.

Jan 4, 2012, 02:32 PM IST

पुण्यात राष्ट्रवादीचा एकलो चलोचा नारा

www.24taas.com - पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीची शक्यता नसल्याचं स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jan 4, 2012, 02:32 PM IST

मनसेच्या मिळून साऱ्याजणी प्रचारात

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये आता पासूनच प्रचाराला सुरूवात झालीय. त्या वॉर्डातून मनसेच्या तिकीटासाठी सात महिला उमेदवार इच्छुक आहेत. तसंच त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकालही अजून लागलेला नाही. मात्र तिकीट वाटपाची वाट न पाहता त्या सातही इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराला सुरवात केलीय.

Dec 24, 2011, 04:05 PM IST

मुस्लिम आरक्षणाचा सरकारी डाव

उत्तर प्रदेशात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकारी नोकऱ्यांत मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसनं हुकुमाचा पत्ता फेकलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मुस्लिमांना साडेचार टक्क्यांचं आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राजकारणही तापू लागलंय.

Dec 23, 2011, 07:40 PM IST

मालवणमध्ये होणार काँग्रेसचाच नगराध्यक्ष

प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dec 23, 2011, 08:16 AM IST

इमेजसाठी उमेदवार लागलेत वाचायला

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.

Dec 20, 2011, 12:02 PM IST

इंग्लंड संसदेत भारतीय सीमा मल्होत्रा

इंग्लंडमधील पोटनिवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवार सीमा मल्होत्रा यांनी बाजी मारली.

Dec 17, 2011, 06:57 AM IST