मोदींना टोला, गुजरातमध्ये खून कसे पडलेत - शरद पवार
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता टीका केलीय़. शेजारच्या राज्यातले मुख्यमंत्री विकासाच्या गप्पा मारतायत, मात्र याच राज्यात खून कसे पडले आहेत याचं चित्र लोकांसमोर असल्याची टीका पवारांनी मोदी यांचं नाव न घेता केली आहे.
Feb 22, 2014, 04:41 PM ISTनरेंद्र मोदींबाबत अमेरिकेचे एक पाऊल मागे?
गुजरात दंगलीच्या मुद्यांवर नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याची अमेरिकीची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल आज गांधीनगरमध्ये मोदींना भेटणार आहेत.
Feb 13, 2014, 08:36 AM ISTRSS ही विषारी विचारधारा, राहुल गांधींचा घणाघात
आरएसएस ही विषारी विचारधारा आहे... आणि या विचारधारेनंच गांधीजींची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधींची आज मोदींच्या गुजरातमध्ये बारडोलीत सभा झाली. त्यात ते बोलत होते.
Feb 8, 2014, 02:50 PM ISTमी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.
Jan 28, 2014, 11:11 AM ISTएटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!
एटीएममधून आतापर्यंत आपण केवळ पैसे काढले आहेत. आता एटीएममधून दूध मिळणार.... तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. गुजरातच्या आणंदमध्ये अमूल डेअरीने एनी टाइम मिल्क (एटीएम) मशीन लावले आहे.
Jan 27, 2014, 09:20 PM ISTगुजरात दंगली प्रकरणी मोदींना माफी मागायची गरज नाही- सलमान
बॉलिवूडचा दबंग खान सलमाननं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची स्तुती केलीय. सलमाननं एका न्यूज वाहिनीसोबत बोलतांना गुजरात इथं २००२मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची काही गरज नाही, असंही म्हटलंय. सलमान म्हणतो जेव्हा कार्टानं याबाबतीत त्यांना क्लीनचिट दिलीय. तर मोदींना मागण्याची गरज नाही.
Jan 20, 2014, 11:17 AM ISTराज ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार, युती तोडा - भाजप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींवरील विधानानंतर नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये कटूता वाढलीये. उद्या होणा-या भूमिपूजन आणि विकास कामांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. दरम्यान, मनसेबरोबरची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
Jan 10, 2014, 06:35 PM IST`आप`चा मोदींना दे धक्का, गुजरातमध्ये `झाडू`
गुजरातमधील भाजपचे आमदार कनुभाई कलसरिया यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केलाय. हा मोदींना धक्का मानला जात आहे.
Jan 2, 2014, 08:23 AM ISTसावंतवाडीतील कार अपघातात ५ ठार, दोन जखमी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव येथे झालेल्या भीषण कार अपघातात पाच जण ठार झाले. कारचा टायर फुटल्याने ती दरीत कोसळली. या अपघातात बालकांसह पाच जण ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत.
Dec 21, 2013, 11:21 PM ISTसुरतच्या डीसीपींना नारायण साई समर्थकाकडून जीवे मारण्याची धमकी
नारायण साईंविरोधातल्या बलात्कार प्रकरणात चौकशी करत असलेल्या सुरतच्या पोलीस अधिकारी शोभा भुताडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. नारायण साईंविरोधात यापुढं अधिक चौकशी कराल तर जीव गमवावा लागेल या भाषेत त्यांना धमकावण्यात आलंय.
Oct 21, 2013, 02:48 PM ISTमोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
Oct 17, 2013, 07:59 AM ISTअडवाणी-मोदी एकाच व्यासपीठावर, मतभेद मिटले?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हे दोघं एकत्र दिसतील.
Oct 16, 2013, 01:06 PM ISTमोदी पंतप्रधान झाले तर देश सोडेन - लेखक डॉ. अनंतमूर्ती
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची घोषणा झाल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं टीका होत आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी देश सोडण्याची धमकी दिलेय.
Sep 21, 2013, 09:02 AM ISTदेशात मोदी फिव्हर, नमो अल्बम लॉन्च
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी आजचा दिवस खास आहे. कारण मोदींचा आज ६३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गुजरातपासून दिल्लीपर्यंत वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
Sep 17, 2013, 09:44 AM ISTगुजरातची सेवा करायचेय, पंतप्रधानपदाचे स्वप्न नको – मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपन लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद बहाल केले. तर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींना प्रमोट केले. मात्र, शिक्षक दिनाच्या कार्य़क्रमात मोदींनी मला गुजरातची २०१७पर्यंत सेवा करायची आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलेले नाही, असे विधान केले आहे.
Sep 6, 2013, 08:35 AM IST