कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती, भारतात जल्लोष
कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती, भारतात जल्लोष
May 18, 2017, 07:59 PM ISTकुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती, भारतात जल्लोष
कुलभूषण जाधवांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
May 18, 2017, 07:50 PM ISTजाधव यांना गुप्तहेर म्हणता येणार नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. शेवटचा निकाल येईपर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. कोर्टने स्पष्टपणे म्हटलं आहे की, कुलभूषण जाधवला गुप्तहेर नाही म्हणता येणार. न्यायाधीश रोनी अब्राहम यांनी निकाल देतांना म्हटलं की, जाधव हे गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा दावा मान्य नाही करता येणार. व्हियन्ना करारानुसार भारताला कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. अब्राहम यांनी म्हटलं की, जाधव यांना केलेली अटक हा वादाचा विषय आहे. शेवटचा निर्णय येईपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या निर्णयावर स्थगिती असली पाहिजे. पाकिस्तानने असा कोणताही मोठा निर्णय घेऊ नये ज्यामुळे बदल्याची भावना निर्माण होईल.
May 18, 2017, 04:48 PM ISTपाकिस्तानला कोर्टाचा दणका, जाधव यांच्या फाशीला स्थिगिती
माजी भारतीय नेव्हीचा अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या विरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सोमवारी आपली बाजु मांडली. यावर आज निकाल आला.
May 18, 2017, 04:09 PM IST