konkan

'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.

Jan 12, 2017, 08:28 AM IST

कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला बुरे दिन?

निवडूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कोकणातदेखील तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे.

Jan 11, 2017, 09:56 PM IST

नोटाबंदीच्या काळातही नवीन वर्षांच्या स्वागताला कोकण किनारे भरगच्च!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...

Dec 27, 2016, 10:26 PM IST

कोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर  करण्यात आली आहे.

Nov 25, 2016, 08:32 AM IST

कोकणातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव नाराज

राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव नाराज आहेत. माजी आमदार रमेश कदम यांना चिपळूण-संगमेश्वरची जबाबदारी दिल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Oct 26, 2016, 02:00 PM IST

कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Oct 2, 2016, 05:27 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प

 मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

Sep 23, 2016, 10:51 PM IST

कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी

कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sep 21, 2016, 11:23 PM IST

कोकणवासियांचे परतीच्या प्रवासात होतायंत हाल

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येनं ट्रेन उपलब्ध केल्यानं कोकणात जाणा-या भाविकांना प्रवास सुखाचा वाटला. पण आता परतीच्या प्रवासात या प्रवाशांना पुन्हा प्रभू आठवायला लागेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीत प्रवास करावा लागतोय. रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या नियोजनशुन्यतेमुळे प्रवाशांवर ही वेळ आली आहे.

Sep 12, 2016, 10:58 AM IST

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून होते. कोकणातल्या पहिल्या देवरुखमधील मानाच्या गणपतीचं आगमन झाले.

Sep 3, 2016, 11:39 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेत तर दुसरीकडे सलग सुट्ट्यांचा विकेंड यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांचा रांगा दिसत आहेत.

Sep 3, 2016, 10:03 AM IST

कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर

गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Aug 23, 2016, 07:29 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंदी, वाहतूक पर्यायी मार्गाने

मुंबई-गोवा महामार्गवर पडलेले खड्डे आणि महाड येथील दुर्घटनास्थळी सुरु असलेल्या शोध कार्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

Aug 5, 2016, 07:27 PM IST