सुवर्णपदक हातात घेऊन बिंद्राची कॉमनवेल्थमधून निवृत्ती
कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
Jul 26, 2014, 08:03 AM ISTजर पॉटिंग दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला असता तर?
क्रिकेटमधून निवृत्ती घेणं कोणत्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. मात्र निवृत्तीचा तो दिवस प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतोच. कधी निवृत्ती घेणं बातमी होते तर कधी वेळेवर निवृत्ती न घेणं सुद्धा... निवृत्तीच्या बातम्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंग चर्चेत आला होता. कारण त्यानं टेस्ट क्रिकेटला दोन वर्ष जास्त दिल्याची चर्चा आहे.
Jun 11, 2014, 08:50 AM ISTमोदी, तर मी निवृत्त होईन - अहमद पटेल
नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. त्यांनी केलेला दावा खरा ठरला तर मी सार्वजनिक राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करीन, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी दिलेय.
May 2, 2014, 04:03 PM ISTग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ अलविदा करणार असल्याचं सांगितलं जातंय.
Mar 4, 2014, 06:57 PM IST‘द वॉल’ राहुल द्रविडला जॅक कॅलिसनं टाकलं मागे!
दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.
Dec 29, 2013, 06:53 PM ISTऑलराऊंडर जॅक कॅलिस होणार निवृत्त…
दक्षिण आफ्रिकन ऑलराऊंडर क्रिकेटर जॅक कॅलिसने भारताविरूद्ध होणाऱ्या डर्बन टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 25, 2013, 05:06 PM IST<B> निवृत्तीनंतर क्रिकेटर्स अडकतात निराशेच्या गर्तेत - सर्व्हे </b>
क्रिकेटला आपलं सर्वस्व मानून खेळणारे क्रिकेटर्स निवृत्तीनंतर निराशेच्या गर्तेत अडकतात, असं नुकतंच एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. ऑस्ट्रेलियाच्या रिटायर्ड क्रिकेटर्सवर केल्या गेलेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आलीय.
Dec 23, 2013, 04:08 PM ISTनिवृत्तीनंतर काय आहे सचिनचा प्लान?
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर आता निवांत आहे. आपल्या मुलांना आणि कुटुंबाला दिलेल्या शब्दानुसार सचिननं आता त्यांना वेळ द्यायचं ठरवलंय. त्यासाठी तो लवकरच भारताबाहेर फिरायला जाणार आहे.
Nov 18, 2013, 04:07 PM ISTसचिन रिटायर्ड होतांना...
सचिन तेंडुलकर नावाचं वादळ आज मैदानावर शांत झालं. सचिन आऊट झाला आणि आख्खं वानखेडे स्तब्ध झालं. मुंबई क्षणभरासाठी थबकली आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या आणि सर्वसामान्याच्या मनात गलबललं. लोकलमध्ये, ऑफिसात, टीव्हीच्या दुकानांबाहेर गर्दी करुन मॅच बघणाऱ्या, मोबाईलवर स्कोअर जाणून घेणाऱ्या, टॅक्सीत एफएमवर रेडिओवर स्कोअर ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात चर्र झालं.. काहींच्या प्रतिक्रियेतून ते आलं, तर काहींचे डोळे पाणावले.. त्या धूसर दृष्टीतून मैदानातून बाहेर पडणाऱ्या सचिनला निरोप देताना प्रत्येकाच्या जीवावर येत होते... मैदानातून पॅव्हेलियनकडे परतणारा हा आपला सचिन पुन्हा मैदानावर दिसणार नाही.. सच्चिन... सच्चिन हे स्वर उच्चरवात परत कानी येणार नाहीत. याची खंत प्रत्येकाच्या मनात डाचत होती.
Nov 16, 2013, 07:52 PM ISTदाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही !
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने केले आहे.
Nov 12, 2013, 11:27 AM IST‘आम्ही कधी विचारही केला नव्हता की सचिन...’
अवघ्या सोळा वर्षांचा असताना सचिन भारताचं प्रतिनिधित्व करणार आणि इतके रेकॉर्ड बनवणार, असा विचारही तेंडुलकर कुटुंबीयांनी कधी केला नव्हता... असा खुलासा केलाय मास्टर ब्लास्टरचे भाऊ अजित तेंडुलकर यांनी.
Nov 5, 2013, 12:48 PM IST२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.
Oct 16, 2013, 01:23 PM ISTसचिनबरोबर दहा नंबरची जर्सीही निवृत्त!
सचिनची दहा नंबरची जर्सी एव्हाना प्रेक्षकांच्या चांगलीच डोक्यात उतरलीय. सचिन निवृत्ती घेणार म्हटल्याबरोबर ही जर्सी कुणाच्या अंगावर दिसणार? असाही प्रश्न अनेकांना पडला होता...
Oct 13, 2013, 05:59 PM ISTसचिन म्हणतो, `आई तुझ्याचसाठी...`
१४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर आपल्या टेस्ट क्रिकेटमधील शेवटची मॅच खेळणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे.
Oct 12, 2013, 07:50 PM IST`निवृत्तीनंतरही क्रिकेटला देणार योगदान`
रिटायरमेंटनंतर आपण क्रिकेट प्रशासनाला पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन क्रिकेटर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं आपल्याला दिलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिलीय.
Oct 12, 2013, 07:24 PM IST