saamana

मुंबईला तोडण्याचा डाव हा केवळ खोटा प्रचार - देवेंद्र फडणवीस

मुंबईतील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावे यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव म्हणजे हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप होतो. पण हा आरोप सरासर खोटा असून केवळ अपप्रचार करण्याच्या हेतूनं होतोय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.  हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. 

Dec 9, 2014, 03:23 PM IST

सेनेच्या आक्रमकपणामुळे भाजप पळाले - सामना

विश्वासदर्शक ठरावावेळी विधिमंडळात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आलाय.

Nov 13, 2014, 01:41 PM IST

शरद पवारांवर 'सामना'त शेलक्या शब्दात टीका

कालपर्यंत भाजप हा तद्दन जातीयवादी व हाफचड्डीवाल्यांचा पक्ष होता आणि या हाफचड्डीवाल्यांची मनसोक्त खिल्ली शरद पवार यांनी प्रचारात उडवली, त्या हाफचड्डीच्या प्रेमात पटेल पडले. म्हणजे पवार-पटेलांनी बाजारातून नवी हाफचड्डी विकत आणली की स्वत:च्या फुल पॅण्टीला कैची मारून त्याची हाफचड्डी केली?, अशा शेलक्या शब्दात टीका 'सामना'तून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आली आहे.

Oct 21, 2014, 09:19 AM IST

'भाजप'चं 'ढोंग'समोर आणण्यात महाराष्ट्र हित

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने आपल्या संपादकीयमधून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं ढोंग जनतेसमोर आणण्यात महाराष्ट्र हित असल्याचं सामनाने म्हटलंय. भाजपने लग्न बारशात पितृपक्षाचे जेवण भरकरण्यासारखे ढोंग सुरू केले असल्याच सामन्यात म्हटलंय.

Oct 14, 2014, 01:45 PM IST

मोदींवर टीका, 'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती !

'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती ! अहो, हा महाराष्ट्र आहे. या मथळ्याखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. काय लिहिलंय सामनामध्ये.

Oct 7, 2014, 11:34 AM IST

राजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल

शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे. 

Oct 2, 2014, 01:23 PM IST

पितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!

महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 26, 2014, 08:37 AM IST