'मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत', भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका..
Sanjay Raut Critisizes Shinde Group : भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Political News)
Mar 14, 2023, 11:20 AM ISTSheetal Mhatre : हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?; व्हायरल व्हिडीओवरुन शीतल म्हात्रे संतापल्या
Sheetal Mhatre : फेसुबकवर मातोश्री नावाच्या पेजवरून आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय
Mar 12, 2023, 11:36 AM ISTED Custody Sadanand Kadam : रामदास कदम यांचे सख्खे भाऊ ईडीच्या ताब्यात
ED Custody Sadanand Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.
Mar 10, 2023, 12:25 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.
Mar 10, 2023, 11:34 AM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar on corruption : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.
Mar 10, 2023, 08:19 AM ISTMaharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला
Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही 50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 9, 2023, 12:55 PM ISTMaharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत
Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.
Mar 9, 2023, 11:46 AM ISTधैर्यशील माने गद्दारी का केली... शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का?, ठाकरे गट आक्रमक
Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने ( MP Darishsheel Mane ) यांची गाडी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापुरात अडवली. 'साहेब गद्दारी का केली? शिवसेनेत 6 महिने हेरगिरी करायला आला होतात का? अशा शब्दांत त्यांना ठाकरे गटाकडून जाब विचारण्यात आला.
Mar 9, 2023, 11:05 AM ISTMaharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज
Uddhav Thackeray Sabha : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. (Maharashtra Political) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. (Maharashtra Political News)
Mar 9, 2023, 10:37 AM ISTVideo | उद्धव ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी मुस्लिम संघटनेकडून पत्रक जारी
Leaflet issued by Muslim organization to attend Uddhav Thackeray meeting
Mar 4, 2023, 01:10 PM ISTRavindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा
Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
Mar 2, 2023, 03:42 PM ISTRavindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?
Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 950 मतांनी विजय मिळवत भाजपाचा करेट कार्यक्रम केला. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल रवींद्र धंगेकर यांच्याबाजुने लागला.
Mar 2, 2023, 12:21 PM ISTPune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स
Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)
Mar 2, 2023, 09:02 AM ISTMaharashtra Budget Session : आजचा दिवस पुन्हा गाजणार, राऊत प्रकरणात सत्ताधारी तर महागाईविरोधात विरोधक आक्रमक
Maharashtra Budget Session 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या विरोधातला हक्कभंग मुद्दा आज पुन्हा विधीमंडळ सभागृहात निघण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session ) संजय राऊतांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलं आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात रणकंदन माजले होते. महागाईच्या मुद्द्यावार कालप्रमाणेच आजही विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत.
Mar 2, 2023, 08:16 AM ISTSanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान
Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला.
Mar 1, 2023, 03:20 PM IST