zee24taas

डोळ्यांवर पट्टी बांधून केविन पीटरसनची फटकेबाजी, व्हिडिओ वायरल

आक्रमक बॅट्समन म्हणून प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला आपण प्रत्येक प्रकारचा शॉट मारतांना पाहिलंय. स्विच हिट त्याचा सर्वाधिक आवडता शॉट्स पैकी एक आहे, ज्याचा वापर तो अनेकदा करतो. मात्र एका व्हिडिओमध्ये पीटरसननं जो कारनामा केलाय, तो पाहून आपणही थक्क व्हाल.

Oct 8, 2015, 02:30 PM IST

खास मुलाखत: ऐश्वर्यातील आईनं रडवलं, जज्बाबाबत इरफानची प्रतिक्रिया

तब्बल पाच वर्षानंतर ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येतेय. तिचा 'जज्बा' हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर म्हणजे उद्या रिलीज होतोय. ऐश्वर्या सोबत इरफान खान यात मुख्य भूमिकेत आहे.

Oct 8, 2015, 02:05 PM IST

व्हॉट्स अॅप आणि गूगलचा करार, गूगल ड्राइव्हवर आता घेऊ शकता बॅकअप

जगातील सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं गूगलसोबत कंटेट बॅकअपसाठी करार केलाय. या अंतर्गत व्हॉट्स अॅपचा सर्व कंटेट जसं चॅट, व्हिडिओ आणि फोटोचं बॅकअप गूगल ड्राइव्हवर घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर जुने चॅट्स सुद्धा गूगल ड्राइव्हवरून रिस्टोर केलं जावू शकेल.

Oct 8, 2015, 12:43 PM IST

IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार

शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.

Oct 8, 2015, 12:01 PM IST

'दिलवाले'च्या पहिल्या फोटोत दिसला शाहरूख-काजोलचा जादू

'दिलवाले'च्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आणि शाहरुख खाननं या चित्रपटातील एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये शाहरूख खान आणि काजोल एकमेकांचा हात पकडून उभे आहेत. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.

Oct 8, 2015, 11:36 AM IST

लग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...

असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.

Oct 8, 2015, 11:09 AM IST

मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी

शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. याबाबत बोलतांना गुलाम अली यांनी आपली भावना व्यक्त केलीय.  

Oct 8, 2015, 10:43 AM IST

'विको'चे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर यांचं निधन

'विको' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर यांचं प्रदीर्घ आजारानं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. परळमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून पेंढारकर यांची प्रकृती खालावली होती.

Oct 8, 2015, 09:24 AM IST

चपराशीच्या पोस्टसाठी १५ हजार इंजीनिअर आणि ६२ हजार ग्रॅज्युएट तयार

उत्तर प्रदेशात चपराशीच्या नोकरीसाठी बीटेक, पीएचडी डिग्री असणारे उमेदवारांची खूप चर्चा झाली होती. आता तसंच मध्य प्रदेशमध्ये घडलंय. राज्यात इंजीनिअर आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांदरम्यान चपराशी आणि चौकीदाराच्या पोस्टसाठी शर्यत लागलीय.

Oct 7, 2015, 05:04 PM IST

मोदींना सिद्धूसाठी ट्विट करता येतं पण 'दादरी'बाबत नाही - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योत सिंह सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट केलं. त्यावरूनच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना टार्गेट केलंय. पंतप्रधानांना सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट करायला वेळ आहे पण अखलाकच्या हत्येबाबत नाही.

Oct 7, 2015, 04:12 PM IST

९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा

१३ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होतोय. अनेक भाविक नवरात्रीच्या नऊही दिवशी व्रत ठेवतात. व्रत सुरू करण्यासाठी ते कशाप्रकारे ठेवावं? फलाहार करायचाय की दूध किंवा ज्यूस पिऊन उपवास करायचाय. 

Oct 7, 2015, 03:32 PM IST

अल्पवयीन मुलीला दारू पाजून मित्राकडूनच बलात्कार, तिघांना अटक

अल्पवयीन मैत्रिणींला दारू पाजून तिच्यावर स्वतःच्या चुलत बहिणीच्या मदतीनं मित्रा बरोबर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बाल अत्याचार अधिनियम, बलात्काराचे आरोप दाखल केले असून त्यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

Oct 7, 2015, 02:29 PM IST