अमेझॉनचा पुन्हा धमाका, पुढच्या आठवड्यात बंपर सेल
चार दिवसांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या यशानंतर अमेझॉन पुन्हा एकदा तोच सेल घेऊन येत आहे.
मुंबई : चार दिवसांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या यशानंतर अमेझॉन पुन्हा एकदा तोच सेल घेऊन येत आहे. ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान हा सेल चालणार आहे. नुकताच झालेला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा अमेझॉनचा भारतात आल्यापासूनच्या ४ वर्षांमधला सगळ्यात यशस्वी सेल होता.
४ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या या सेलमध्ये ग्राहकांना अमेझॉन पे बॅलन्सच्या माध्यमातून खरेदी केली तर १५ टक्के रक्कम परत मिळणार आहे. तर सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं शॉपिंग केल्यावर आणखी १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
अमेझॉनच्या या सेलमध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, एचपी, ऍपल, वन प्लस, हॉनर, व्हिव्हो आणि नोकियाच्या ब्रॅण्डवर डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे. तसंच वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सवर एक्सचेंज ऑफरही देण्यात येणार आहे.
२४ सप्टेंबरच्या सेलमध्ये अमेझॉननं स्मार्टफोनची विक्रमी विक्री केली. मागच्या दिवाळीपेक्षा या सेलमध्ये अमेझॉननं अडीच पट जास्त स्मार्टफोन विक्री केली. दिवाळी जवळ आली असल्यामुळे ४ ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या या सेलमध्ये ऑनलाईन शॉपिंगचे सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे.