Royal Enfield : क्लासिक लूक, दमदार परफॉर्मन्स आणि रस्त्यावरून जाणारा 'रांगडा गडी' अशी ओळख असणारी रॉयल एनफिल्डची बाईक म्हणजे, अनेक बाईकप्रेमींचा जीव. एनफिल्डनं भारतातील रस्ते, बाईकप्रेमींचं प्राधान्य, दुचाकी चालवण्याची त्यांची शैली या सर्व गोष्टी अंदाजात घेत आतापर्यंत बहुविध मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले. काळानुरूप बाईकचे लूक बदलले, तरीही Classic असणं काही एनफिल्डच्या बाईकनं दुरावलेलं नाही. ज्यामुळं आजही वयाची सत्तरी ओलांडलेल्यांपासून ते अगदी नवीनवी बाईक चालवण्यास शिकलेल्यांनासुद्धा RE ची एक वेगळीच भुरळ पडते.
अशी ही रॉयल एनफिल्ड कंपनी येत्या काळात भारतीयांचं मन जिंकण्यासाठी विशेष प्रयत्नांक असून, तीन दमदार बाईक मॉडेल लाँच करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये दोन बाईक पेट्रोल इंजिनच्या असतील तर, एक बाईक हील इलेक्ट्रीक असेल. उपलब्ध माहितीनुसार कंपनीकडून Royal Enfield Bullet 650, Royal Enfield Flying Flea Electric (FF.S6) आणि Royal Enfield Himalayan Electric अशा बाईक लाँच करण्यासाठी ही कंपनी आता पूर्णत: सज्ज आहे.
डोंगरदऱ्या आणि वळणवाटांसह खडकाळ रस्त्यांवरही कमाल अनुभव देणाऱ्या बाईकमध्ये साहसप्रेमींकडून कायमच रॉयल एनफिल्डला आणि त्यातही हिमालयन मॉडेलला पसंती दिली जाते. याचच इलेक्ट्रीक वर्जन आता कंपनी लाँच करणार असून, EICMA 2023 मध्ये एका संकल्पनेच्या स्करुपात बाईकची झलक दिसल्यानंतर या बाईकचं प्रोडक्शन वर्जन चाचणी टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. या बाईकचा एकंदर लूक हिमालयन 450 प्रमाणच असेल. टॉल विंडस्क्रीन, बॉक्सी बॉडी, लाँग ट्रॅव्हल सस्पेंशन, हीटेड ग्रिप्स, डिजिटल क्लस्टर, स्पोक व्हील्स, राइड-बाय-वायर, मल्टीपल राइडिंग मोड्स अशा सुविधा असतील. या बाईकची किंमत साधारण 7 ते 8 लाख रुपये (एक्स शोरुम) असेल असा अंदाज असून, ती डिसेंबर 2026 मध्ये लाँच होऊ शकते असं सांगण्यात येतंय.
एनफिल्ड म्हणजे बुलेट असंही समीकरण अनेकांच्याच डोक्यात जणू संग्रही असतं. अशा या विक्रमी मॉडेलचं 650 CC इंजिनसह नवं रुपल कंपनी सादर करणार आहे. प्रिमियन डिझाईनसह Royal Enfield Bullet 650 मध्ये टियर-ड्रॉप फ्यूल टँक, राउंड हेडलँप, विंग्ड बॅज, हँड-पेंटेड पिनस्ट्राइप्स असे फिचर असतील. ही बाईक 2026 च्या सुरुवातीलाच लाँच होणं अपेक्षित असून, तिची किंमत 2.80 लाख ते 3.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असेल.
इलेक्ट्रीक वेहिकल क्षेत्रात रॉयल एनफिल्डसुद्धा आता दमदार प्रवेश करणार असून, कंपनी 'फ्लाईंग फ्ली' नावानं एक बाईक लाँच करणार आहे. Flying Flea FF.S6 ही एक स्क्रॅम्ब्लर स्टाईल बाईक असून, अपसाइड-डाउन फोर्क, 19/18 इंच स्पोक व्हील्स, लॉन्ग ट्रॅवल सस्पेंशन देण्यात आले आहेत. TFT टचस्क्रीन, 4G/ब्लूटूथ/वाई-फाई कनेक्टिविटी, वॉइस असिस्टेंट अशा फिचरसह ही बाईक 2 ते 3 लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल असं सांगण्यात आलं आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.