Auto News : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास अनेकांचीच पसंती असते ती म्हणजे एसयुव्ही कारना. मात्र एसयुव्ही कारची चलती असतानाही कारी कार मात्र आजही कालबाह्य झालेल्या नाहीत. लोकप्रियता अबाधित ठेवणाऱ्या या आहेत, 'सेडान कार'. सहसा सेडान कार आरामदायी प्रवास, कार चालवण्याचा उत्तम अनुभव आणि दूरवरच्या प्रवासातही देणाऱ्या सहजतेसाठी ओळखल्या जातात.
कुटुंबाच्या त्यातही चौघं, पाचजणांच्या प्रवासासाठी या कार उत्तम असून, आकारात त्या तुलनेनं लहान असल्यानं शहरी आणि खेडोपाडीच्या रस्त्यांवरही सहजपणे पुढं जातात. महत्त्वाची बाब म्हणजे, या कारच्या किमती बहुतांशी खिशाला परवडणाऱ्या असल्यानं त्यांना अनेकांची पसंती असते. इतकंच नव्हे, तर या कार उत्तम मायलेजही देत असल्यानं बड्या कार उत्पादक कंपन्यासुद्धा सेडान कारनिर्मितीला प्राधान्य देतात. अशाच सेडान कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे आहेत काही उत्तम पर्याय...
टाटा टिगॉर ही भारतातील सर्वात स्वस्त सेडान कारपैकी एक असून, या कारची प्रारंभी एक्स शोरुम किंमत आहे 5.49 लाख रुपये. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असून तिचं पेट्रोल वर्जन 19.2 kmpl आणि सीएनजी व्हेरिएंट 26 km/kg इतकं मायलेज देते. सुरक्षिततेच्या बाबतीत ही कार एक उत्तम पर्याय असून Global NCAPकडून कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आले आहेत. उत्तम बॉडी स्ट्रक्चर, एअरबॅग, एबीएस असे फिचरसुद्धा या कारमध्ये आहेत.
मारुती डिझायर ही भारतातील सर्वाधिक खप होणारी सेडान कार आहे. या कारची प्रारंभी किंमत एक्स शोरुम 6.26 लाख रुपये इतकी आहे. पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणारी ही कार अनुक्रमे 25.71 kmpl आणि 33.73 km/kg इतकं मायलेज देते. 6 एअरबॅग, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, सनरुफ, 360 डिग्री कॅमेरा असे मॉडर्न फिचर या कारला मिळतात. इतकंच नव्हे, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे.
एक्स शोरुम किंमत 5.98 लाख रुपये असणारी सेडान कार म्हणजे ह्युंडई ऑरा. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. जिचं पेट्रोल व्हेरिएंट 20.5 किमी प्रतिलीटर आणि सीएनजी व्हेरिएंट 25 किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. या कारचे दोन्ही व्हेरिएंट 6 एअरबॅगसह उपलब्ध असून त्याशिवाय टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, क्रूज कंट्रोल असे फिचर आरामदायी प्रवासाची मुभा देतात.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
PAK
(20 ov) 190/9
|
VS |
USA
158/8(20 ov)
|
| Pakistan beat USA by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 113/7
|
VS |
QAT
115/3(16.4 ov)
|
| Qatar beat Bahrain by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 173/6
|
VS |
NZ
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.