)
Diwali Car Offers 2025: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या बहुप्रतिक्षित आणि अतिशय सकारात्मक दृष्टीकोन देणाऱ्या या सणानिमित्त सध्या सर्वांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीसाठी नेमकी कोणती वस्तू खरेदी करायची याच पेचात अनेक मंडळी आहेत, तर काहींनी खरेदीच्या गोष्टीसुद्धा ठरवल्या आहेत. यामध्ये वाहनखरेदीला अनेकांचच प्राधान्य दिसून येत आहे.
सहसा दिवाळीच्या दिवसांमध्ये दरवर्षी कार उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांचं लक्ष वेधतील अशा सवलती जारी केल्या जातात. मात्र यंदा या सवलतीतही बोनस आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, यंदाच्या वर्षी वाहन खरेदीचा निर्णय ग्राहकांच्याच फायद्याचा ठरू शकतो. सध्या भारतीय Auto क्षेत्रात चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार Maruti Suzuki, Hyundai आणि TATA अशा कंपन्यांकडून ग्राहकांना कार खरेदीत दुपटीनं फायदा मिळणार आहे. कसा तेही पाहून घ्या....
दरवर्षी दसऱ्यापासून धनत्रयोदशीपर्यंत कार खरेदीची सर्वाधिक विक्री नोंदवली जाते. याच कारणामुळ यंदासुद्धा यादरम्यान कैक कार कंपन्या दिवाशीच्या अनुषंगानं दमदार सवलती आणत असून यामध्ये Maruti Suzuki, Hyundai, Tata Motors, Mahindra, Honda आणि Toyota अशा जवळपास सर्वच कंपन्यांचा समावेश आहे. ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी कंपनीकडून रोकड स्वरुपात सवलत, एक्सचेंज ऑफर (Exchange Offer), कॉर्पोरेट स्कीम अशा एकाहून अनेक सवलती दिल्या जात आहेत.
टाटा मोटर्सकडून Tata Motors हॅरियर या एसयुव्ही (SUV Harrier ) कारच्या 2024 मधील मॉडेलवर 50000 ची थेट सवलत दिली जात आहे. शिवाय 25 हजारांचा एक्सचेंज बोनस. तर, होंडा इंडियाकडून दिवाळीनिमित्त मिड-साइज SUV Elevateच्या टॉप मॉडेल ZX ट्रिमवर ग्राहकांना तब्बल 1.32 लाख रुपयांचा फायदा मिळत आहे. ज्यामध्ये कॅश बेनिफिट, लॉयल्टी, कॉर्पोरेट स्कीम आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
सणासुदीच्या या दिवसांमध्ये डिलरशिपवर याचा थेट परिणाम दिसून येत असून, मार्केट आकडेवारी आणि काही अहवालांनुसार दसऱ्यापासून धनत्रयोदशीच्या आधीपर्यंत कार बुकिंगमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावेळी ग्राहकांनी एयसुव्हीसह इलेक्ट्रीक कारमध्ये विशेष लक्ष केंद्रीत केलं असून, जीएसटी कपात आणि दिवाळी सवलतींचा फायदाच ग्राहक घेऊ इच्छितात हे स्पष्ट होत आहे.
दिवाळी 2025 साठी कोणत्या कार कंपन्यांकडून सवलती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत?
मारुती सुझुकी, ह्युंडई, टाटा मोटर्स, महिंद्रा, होंडा आणि टोयोटा यासारख्या प्रमुख कंपन्यांकडून दिवाळी सवलती जारी केल्या आहेत. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट स्कीम आणि लॉयल्टी बेनिफिट्सचा समावेश आहे.
टाटा मोटर्सकडून कोणत्या मॉडेल्सवर दिवाळी सवलती आहेत?
टाटा हॅरियर (फियरलेस एक्स व्हेरिएंट) वर ₹25000 रोख सवलत + ₹25000 एक्सचेंज बोनस मिळतो. नेक्सॉन, सफारी, पंच आणि टियागो यांवरही ₹10000 ते ₹20000 पर्यंत रोख + एक्सचेंज बोनस उपलब्ध आहेत.
दिवाळी काळात कार बुकिंगमध्ये किती वाढ झाली आहे?
दसऱ्यापासून धनत्रयोदशीपूर्वी कार बुकिंगमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ग्राहक एसयूव्ह आणि इलेक्ट्रिक कारांकडे विशेष आकर्षित होत असून, जीएसटी कपात आणि दिवाळी सवलतींचा फायदा घेण्यावर भर आहे.