Auto News : वाहनप्रेमींना या क्षेत्रातील बरीच माहिती असते आणि ही मंडळी प्रत्येक लहानमोठ्या घटनेबाबत, एखाद्या नव्या कारबाबत कायमच सजग असतात. अशा वाहनप्रेमींच्या विश्वात सध्या एका जुन्या कारची बरीच चर्चा सुरू आहे. ही कार म्हणजे अनेकांचच प्रेम. पण, एकाएकी तिची अशी चर्चा होण्यामागं नेमकं कारण काय?
तर, एक काळ होता जेव्हा ईस्ट जर्मनीच्या ट्राबांट कार (Trabant Car), जी ट्रॉबी या नावानंही ओळखली जात होती अन् तिला फारशी लोकप्रियता नव्हती. अनेकांसाठी ही निन्म दर्जाची कार होती. काहीसा ठोकळ्यासारखा दिसणारा तिचा आकार, असहज करणारी आसनव्यवस्था, कार सुरू केल्यावर येणारा धुर यामुळं अनेकांनीच या कारला नावं ठेवलं.
कम्युनिस्ट काळाती नाईलाज म्हणतही या कारला हिणवण्यात आलं. एक अशी कार जिची खरेदी तर होत होती, मात्र ती फार कमीजणांच्या पसंतीस उतरत होती. आता मात्र या कारकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. जवळपास 35 वर्षांनंतर ही ट्रॉबी जर्मनीच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा रुबाबात फिरताना दिसू लागली आहे. एकेकाळी अनेकांनीच दुषणं लावलेली ही कार आज मात्र एक क्लासिक रेट्रो आयकॉन म्हणून रस्त्यांवर दिसत आहे. पण, हे असं का घडतंय?
गेल्या काही वर्षांमध्ये जर्मनीत विंटेज आणि जुन्या काळातील वस्तूंचा संग्रह करण्याचा ट्रेंड आला आहे. यामध्ये नागरिक जुन्या वस्तू फक्त स्टाईल आयकॉन म्हणूनच नव्हे, तर त्याकडे इतिहास आणि आपली ओळख या दृष्टीकोनातूनही पाहत आहेत. याच बदलामुळं ट्राबांटचंही नशीब फळफळलं. आजच्या घडीला युवा पिढी या ट्रॉबी कारकडे एक स्टेटमेंट म्हणून पाहत आहे, तर काही मंडळी आठवडी सुट्टीच्या भटकंतीसाठी या कारला पसंती देत आहेत. काही, ही कार संग्रही असावी म्हणून खरेदी करत आहेत.
1957 मध्ये ट्राबांट कारचा जन्म झाला. ईस्ट जर्मनीमध्ये तेव्हा कम्युनिस्ट शासन होतं. त्यावेळी स्टीलचा मोठा तुटवडा होता. अशा स्थितीत इंजिनिअर क्षेत्रानं यावर अनोखा तोडगा काढत कारचा सांगाडा स्टीलऐवजी प्लास्टीक, पेपर आणि कॉटन फायबरनं तयार केला. ही सामग्री हलकी आणि स्वस्त होती. मात्र टीकाऊ नव्हती. याच कारणास्तव ही कार सहजपणे अपघातात नुकसान पावत होती आणि तिला पसंती मिळत नव्हती. कारचं लहान इंजिन आवाज करत असे, ज्यामुळं त्यातून निघणारा धूर पाहता 'जगातील सर्वात वाईट कार' अशा शिक्का तिच्यावर मारण्यात आला.

बर्लिन वॉल पडल्यानंतर ही कार स्वातंत्र्य आणि बदलाचं प्रतीक ठरली. आजच्या घडीला जेव्हा नागरिक जुन्या आठवणींमध्ये रमू पाहत आहेत तेव्हा त्या काळावर भाष्य करणारी ट्राबांटही तिथं दिसत आहे. रेट्रो डिझाईन, सोपी यंत्रणा आणि अनोखा इतिहास यामुशळं ऑटोमोबाईल प्रेमींमध्ये ही कार अधिक चर्चेत आहे. कार नाजूक असली तरीही तिचा इतिहास कमाल असल्यानंच सध्या अनेकांच्या पसंतीस ती उतरत आहे.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.